लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जगावर कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे आणि अशा काळात रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे. या कठीण काळाचे महत्त्व लक्षात घेऊन स्वातंत्र्य संग्राम सेनानी, ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्व. जवाहरलाल उपाख्य बाबूजी दर्डा यांच्या जयंतीदिनी ‘लोकमत’ आणि ‘लाईफ लाईन ब्लड बँक’ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी सकाळी १० ते दुपारी ३ दरम्यान लोकमत कार्यलय, विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.बाबूजींची जयंती २ जुलै रोजी साजरी करण्यात येते. दरवर्षी त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर आणि गोव्यामध्येही भव्य रक्तदान शिबिरे घेण्यात येतात. यावर्षी संपूर्ण जगावर घोंघावत असलेल्या कोरोनारूपी संकटामुळे या रक्तदान शिबिरांना अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. या उपक्रमास सकाळी १० वाजता प्रारंभ होईल. वाचकांनी त्यांच्या संपर्कातील रक्तदात्यांना या उपक्रमासंदर्भात माहिती द्यावी. अधिक माहितीसाठी ९२७०१३१५८०, ८१८००१८१८७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. सद्यस्थिती पाहता जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन ‘लोकमत’ आणि लाईफ लाईन ब्लड बँकतर्फे करण्यात आले आहे.लोकमत सखी मंच, वाचकांना आवाहनबाबूजींच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या सामाजिक उपक्रमात सखी मंच सदस्य, विक्रेते बंधू व वाचकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे. लाईन लाईन ब्लड बँक डोनर कार्ड देऊन दात्यांचा गौरव करण्यात येईल.सॅनिटायझरची व्यवस्था, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालनकोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रशासन व सरकारच्या नियमांचे तंतोतंत पालन करीत विशेष काळजी घेण्यात येणार आहे. सॅनिटायझरची व्यवस्था आहे. यासोबतच फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे तंतोतंत पालन केले जाणार आहे.
आज भव्य रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 05:00 IST
बाबूजींची जयंती २ जुलै रोजी साजरी करण्यात येते. दरवर्षी त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर आणि गोव्यामध्येही भव्य रक्तदान शिबिरे घेण्यात येतात. यावर्षी संपूर्ण जगावर घोंघावत असलेल्या कोरोनारूपी संकटामुळे या रक्तदान शिबिरांना अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. या उपक्रमास सकाळी १० वाजता प्रारंभ होईल. वाचकांनी त्यांच्या संपर्कातील रक्तदात्यांना या उपक्रमासंदर्भात माहिती द्यावी.
आज भव्य रक्तदान शिबिर
ठळक मुद्दे‘लोकमत’चा पुढाकार : लाईफ लाईन ब्लड बँकचे सहकार्य, आज उपक्रम