बीडीओंविरुद्ध ग्रामसेवकांचा एल्गार

By Admin | Updated: April 2, 2017 00:13 IST2017-04-02T00:13:49+5:302017-04-02T00:13:49+5:30

येथीेल एका महिला ग्रामसेवकाला बीडीओ अरविंद गुडधे यांनी असभ्य शब्द सूनाविल्याच्या कारणावरुन ग्रामसेवक संघटेनेने बीडीओविरुद्ध एल्गार पुकारला आहे.

Gramsevak's Elgar against BDS | बीडीओंविरुद्ध ग्रामसेवकांचा एल्गार

बीडीओंविरुद्ध ग्रामसेवकांचा एल्गार

असभ्य वागणूक : आरोप फेटाळला
दर्यापूर : येथीेल एका महिला ग्रामसेवकाला बीडीओ अरविंद गुडधे यांनी असभ्य शब्द सूनाविल्याच्या कारणावरुन ग्रामसेवक संघटेनेने बीडीओविरुद्ध एल्गार पुकारला आहे. दोन दिवसांपासून पंचायत समितीत वातावरण तापले होते. पण जर एखाद्या ग्रामसेवकाने कामचुकारपणा केला असेल तर त्याला विचारणा करणे गैर आहे का, अशी भूमिका बीडीओने मांडली. त्यामुळे या प्रकरणाची सत्यता काय, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
दर्यापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी नालवाडा येथील दलितवस्ती प्रकरणावरून एका महिला ग्रामसेवकांना कार्यालयात बोलावून अपमानस्पद वागणूक दिल्याचा आरोप ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. ग्रामसेवक जर कामचुकारपणा करीत असेल तर त्यांना कामासंदर्भात विचारणा करणे गैर आहे का, असा सवाल बीडीओंनी सांगितले. ग्रामसेवक संघटेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बीडीओच्या वागणुकीच्या मुद्यावरून परिसरात उपोषण सुरू केले. यावेळी सभापती गजानन देवतळे यांनी या वादाला शांत करण्याचा प्रयत्न केला. (तालुका प्रतिनिधी)

नालवाडा येथील लाभार्थी ग्रामसेवकाची तक्रार घेऊ माझ्याकडे आले. त्यामुळे ग्रामसेवकाला बोलावून मी त्यांना विचारणा केली. जर कुणी कामचुकारपणा करीत असेल तर विचारणा करणे काही गैर नाही.
- अरविंद गुडधे, गटविकास अधिकारी दर्यापूर

Web Title: Gramsevak's Elgar against BDS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.