शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीच्या आरक्षणामुळे इच्छुक उमेदवारांचा भ्रमनिरास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST

अचलपूर तालुक्यात पथ्रोटची ग्रामपंचायत सहा वॉर्डात १७ सदस्य असलेली मोठी ग्रामपंचायत आहे. कारभारही तेवढाच मोठा आहे. मात्र, सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यामुळे गावगाड्यातील बड्या प्रस्थांनी निवडणुकीतून काढता पाय घेतला. परिणामी गावभरात तापलेले वातावरण थंडावल्याचे दिसते. अचलपूर तालुक्यात एकूण ७२ ग्रामपंचायतींपैकी ४० ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला.

ठळक मुद्देवातावरण थंडावले : अचलपूर तालुक्यात १६ बडी गावे

पथ्रोट : स्थानिक ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव होताच गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या उमेदवारांचा भ्रमनिरास झाल्याचे चित्र पथ्रोटमध्ये पसरलेले आहे.अचलपूर तालुक्यात पथ्रोटची ग्रामपंचायत सहा वॉर्डात १७ सदस्य असलेली मोठी ग्रामपंचायत आहे. कारभारही तेवढाच मोठा आहे. मात्र, सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यामुळे गावगाड्यातील बड्या प्रस्थांनी निवडणुकीतून काढता पाय घेतला. परिणामी गावभरात तापलेले वातावरण थंडावल्याचे दिसते. अचलपूर तालुक्यात एकूण ७२ ग्रामपंचायतींपैकी ४० ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यापूर्वी अनेक गावपुढारी सरपंचपदाकडे डोळे लावून होते. मात्र, बुधवारी सोडत जाहीर होताच सरपंचपदाच्या स्वप्नावर पाणी फेरले गेले.अचलपूर तालुक्यात महत्त्वाच्या व मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये पथ्रोट, शिंदी, धामणगाव गढी, येसूर्णा, चमक, सावळापूर, खेल देवमाळी, वडगाव फत्तेपूरसह एकूण १६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.आरक्षण सोडतीमुळे राजकीय नेत्यांनी ठरवलेले डावपेच फोल ठरले असून, स्थानिक राजकारणासह गावपातळीच्या ‘मंत्रालया’त राम नसल्याची कुजबुज सुरू आहे. आपल्या कानाखालचा उमेदवार निवडून सरपंच ठरवावा, असा बेत ते आखत आहेत. त्यातच थेट सरपंच निवड रद्द केल्याने काही सरपंचपद अनुचित राखीव झाल्याने ‘आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास’ अशी गत झाल्याचे निदर्शनास येते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत