लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१८ च्या अनुषंगाने प्रत्येक महाविद्यालयात पदवीदान समारंभ घेणे अनिवार्य आहे. त्याअनुषंगाने येथील विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीच्या एकूण महाविद्यालयांचा पदवीप्रदान सोहळा रविवारी थाटात पार पडला. यावेळी ६ सुवर्ण, ४३ गुणवत्ता श्रेणी, २४५ पदव्युत्तर, तर १४८६ पदवीधरांना सन्मानित करण्यात आले. या आगळ्यावेगळ्या सोहळ्याने विद्यार्थ्यांसह पालकही भारावले होते.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष नितीन धांडे होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे हेमंत देशमुख, पंकज देशमुख, युवराजसिंग चौधरी, नितीन हिवसे, उदय देशमुख, गजानन काळे, रागिणी देशमुख, प्राचार्य अमोल बोडखे, एम.एस. अली, दिलीप काळे, आर.एस. हावरे, लिना कांडलकर, राजेश गोधळेकर, राजेश देशमुख, शारदा गावंडे, गजेंद्र बमनोटे आदी उपस्थित होते. युवराजसिंग चौधरी यांनी प्रस्ताविकातून संस्थेच्या प्रगतीचा आलेख मांडला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नितीन धांडे यांनी संस्थेच्या प्र्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांनो यश मिळवा, मोठे व्हा, असे आवाहन त्यांनी केले. सोहळ्याचे संचालन निकू खालसा, मैथिली देशमुख यांनी केले.विद्यार्थ्यांसह पालकही भारावलेपदवीप्रदान सोहळा म्हटले की, डोळ्यासमोर विद्यापीठ उभे राहते. मात्र, यंदा पहिल्यांदाच संस्थेने महाविद्यालयातील पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना एकत्रितपणे पदवी प्रदान करून गौरविले. हा भव्यदिव्य सोहळा बघून विद्यार्थ्यांसह पालकही भारावून गेले. संस्थेच्या मान्यवरांच्या हस्ते हा पदवीप्रदान होत असल्याचा आनंद अनेकांच्या मनाला स्पर्श करून गेला.
विदर्भ युथमध्ये पदवीप्रदान सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 22:16 IST
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१८ च्या अनुषंगाने प्रत्येक महाविद्यालयात पदवीदान समारंभ घेणे अनिवार्य आहे. त्याअनुषंगाने येथील विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीच्या एकूण महाविद्यालयांचा पदवीप्रदान सोहळा रविवारी थाटात पार पडला.
विदर्भ युथमध्ये पदवीप्रदान सोहळा
ठळक मुद्देदोन हजार विद्यार्थ्यांना गौरविले : पाल्यांचा उत्स्फूर्त सहभाग