शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा; काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन दोषी, फेडरल गन प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय
3
शाकाहरीबाबत तुमचं मत काय? जैन मुनींच्या प्रश्नावर शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर
4
PM Narendra Modi : सोशल मीडियावरून 'मोदी का परिवार' आता हटवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती
5
भाजपचे धक्कातंत्र! पुन्हा नवीन चेहऱ्याला संधी, मोहन माझी यांना ओडिशाचे मुख्यमंत्रिपद दिले
6
स्पर्धेबाहेर होण्याच्या भितीने पाकिस्तानची कामगिरी सुधारली; जॉन्सनच्या तडाख्याने हुडहुडी भरली
7
'प्रियंकासमोर मोदींचा वाराणसीत 3 लाख मतांनी पराभव झाला असता', राहुल गांधींची बोचरी टीका
8
Fact Check: मोदींविरोधात घोषणा देणारी महिला कंगनाला मारणाऱ्या CISFची आई नाही!
9
Vande Bharat मध्ये शिरले शेकडो विना तिकीट प्रवासी; video व्हायरल होताच नेटकरी भडकले...
10
युवराज सिंगकडून पाकिस्तानच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचं सांत्वन, भन्नाट Video 
11
एक हिरो, एक हिरोईन अन् रहस्यमय मर्डर; तपासात सत्य बाहेर येताच पोलीसही हैराण
12
MMS लीक होताच खचली! निवडणुकीमुळे पुन्हा चर्चेत आली; भोजपुरी क्वीनचा बोल्ड अंदाज
13
Aadhar Card : तुमच्या आधार कार्डचा कुठे-कुठे वापर झाला; सोप्या पद्धतीने हिस्ट्री तपासा
14
वाफाळलेल्या चहासोबत गरमागरम भजी आणि बिस्किट खाताय?; 'हे' फूड कॉम्बिनेशन हानिकारक
15
"पाकिस्ताननं आता पुरूष संघांविरूद्ध खेळू नये कारण...", माजी खेळाडूची बोचरी टीका!
16
अजित पवारांच्या NCP चा नेता 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंसोबत केली चर्चा, नेमकं काय घडतंय?
17
कुठे गायब आहे 'जुम्मा-चुम्मा' गर्ल?, ३२ वर्षांपासून आहे कलाविश्वापासून दूर
18
जेलमधून घरी पोहचला युवक, दरवाजा उघडताच पायाखालची जमीन सरकली; नेमकं काय घडलं?
19
२४ वर्षापासून वर्क फ्रॉम होम करायचे मुख्यमंत्री; आता नव्या CM साठी बंगल्याची शोधाशोध
20
Mallikarjun Kharge : "दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन..."; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

अमरावती जिल्ह्यातील २५० एसटी बसवरील शासकीय जाहिराती काढल्या, आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

By जितेंद्र दखने | Published: March 18, 2024 9:24 PM

Amravati News: लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम शनिवार, १६ मार्च रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर लगेेच आदर्श आचारसंहिता अमलात आली आहे. आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी दिले आहेत.

- जितेंद्र दखनेअमरावती - लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम शनिवार, १६ मार्च रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर लगेेच आदर्श आचारसंहिता अमलात आली आहे. आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी दिले आहेत. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने एसटी बसेसवरील शासकीय जाहिरातींचे फलक तातडीने काढण्याची कार्यवाही एसटी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. विभागातील २५० हून अधिक बसेसवरील शासकीय जाहिराती काढण्यात आल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी एसटी महामंडळाने खबरदारीची पावले उचलली आहेत. एसटी महामंडळाच्या बसेसवर ‘निर्णय गतिमान महाराष्ट्र वेगवान’ या राज्य शासनाच्या आणि अन्य राजकीय जाहिराती तत्काळ हटविण्याच्या सूचना एसटी महामंडळाने विभागीय नियंत्रक तसेच एसटी आगार व्यवस्थापकांना दिल्या आहेत. देशात १८ व्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे आचारसंहितेचा भंग होऊ नये, याअनुषंगाने एसटी बसवरील राजकीय जाहिराती काढून टाकण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

राजकीय जाहिराती काढण्यास टाळाटाळ केल्यास त्यावर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे. कुठल्याही परिस्थितीत आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी प्रत्येक स्तरावरून घेण्यात यावी, अशा सूचना महामंडळाने दिल्या हाेत्या. याअनुषंगाने अमरावती विभागाचे विभाग नियंत्रक यांनी आपल्या अधिनस्त असलेल्या ८ आगारातील ३४३ एसटी बसेसवरील २५० बसेसवर असलेल्या शासकीय व राजकीय जाहिरातींचे लावलेले फलक हटविण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याच्या अनुषंगाने वरिष्ठ पातळीवरून आलेल्या आदेशानुसार एसटी २५० बसेसवरील जाहिरातींचे फलक हटविलेले आहेत.- नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावतीstate transportएसटीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४