शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Good News : पश्चिम विदर्भातील ४९ तालुक्यांतील भूजलस्तरात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2020 18:29 IST

सतत दुष्काळ, कमी पाऊस या पार्श्वभूमीवर पाच वर्षांत व-हाडात पहिल्यांदा सकारात्मक चित्र समोर आले आहे.

- गजानन मोहोडअमरावती : सरासरीपेक्षा अधिक पाऊस, त्यामुळे सिंचनासाठी कमी झालेला उपसा व सप्टेंबरनंतरही झालेल्या पावसाने जलपुनर्भरण यामुळे पश्चिम विदर्भात ४९ तालुक्यांतील भूजलस्तरात वाढ झालेली आहे. त्यातुलनेत फक्त सात तालुक्यांत कमी आलेली आहे. सतत दुष्काळ, कमी पाऊस या पार्श्वभूमीवर पाच वर्षांत व-हाडात पहिल्यांदा सकारात्मक चित्र समोर आले आहे. जलयुक्त शिवारमध्ये झालेल्या हजार कामांचेही सुखद चित्र यानिमित्ताने समोर आले आहे.भूजल सर्वेक्षण विभाग (जीएसडीए) द्वारा अमरावती विभागात झालेले पर्जन्यमान व ६३१ निरीक्षण विहिरींच्या स्थिर पातळीशी पाच वर्षांच्या सरासरीची तुलना केल्यानंतर हे निरीक्षण नोंदविले आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात १४६ विहिरींमध्ये १.५३ मीटरने वाढ झालेली आहे. अकोला जिल्ह्यात ६५ निरीक्षण विहिरींमध्ये ०.२१, वाशीम जिल्ह्यात ७९ विहिरींमध्ये ०.१७, बुलडाणा जिल्ह्यात १६५ विहिरींमध्ये २.३२, तर यवतमाळ जिल्ह्यात १७६ निरीक्षण विहिरींच्या स्थिर पातळीत ०.६८ ने वाढ झाल्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आलेला आहे. अमरावती जिल्ह्यात अंजनगाव सुर्जी, अकोला जिल्ह्यात अकोला, अकोट, तेल्हारा व यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ, दारव्हा, दिग्रस तालुक्यातील भूजलस्तरात कमी आलेली आहे, तर बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात सर्वाधिक ३.६० मीटर, मोताळा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद व अमरावती जिल्ह्यात मोर्शी व वरूड तालुक्यात २ मीटरपेक्षा अधिक वाढ झालेली आहे. भूजलात तूट आलेल्या तालुक्यात महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ अन्वये भूूजल उपशावर नियंत्रण आवश्यक असल्याची शिफारस शासनाला करण्यात आलेली आहे.

आठ टक्के भूभागातच भूजलाची उपलब्धीराज्याच्या एकूण क्षेत्राफळापैकी ८२ टक्के भूभाग हा बेसाल्ट नावाच्या कठीण अशा अग्निजन्य खडकाने व्यापला आहे ज्यामध्ये पाणी साठवण्याची क्षमता अत्यंत कमी म्हणजे १ ते ३ टक्केच आहे. १० टक्के भूभाग कठीण रुपांतरित खडकांनी व्यापला आहे. त्यामध्येही भूजलाची उपलब्धता कमी आहे. उर्वरित ८ टक्के भूभाग हा खडकांनी व गाळाने व्यापला असल्याने त्यात भूजलाची उपलब्धता चांगल्याप्रकारे होत असल्याचे जीएसडीएने सांगितले.

यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाने उपसा कमी झाला व सप्टेंबरनंतरही पाऊस झाला. त्यामुळे जलपुनर्भरण झालेले आहे. याशिवाय विभागात झालेल्या जलयुक्त शिवारमधील कामांचादेखील हा सकारात्मक परिणाम आहे.- उल्हास बंड, भूवैज्ञानिक, जीएसडीए

टॅग्स :WaterपाणीVidarbhaविदर्भDamधरण