शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

'नोकरी द्या, नाही तर लग्न लावून द्या' बेरोजगार युवकाचे मुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 07:00 IST

Amravati news एक तर नोकरी (जॉब) द्या, अन्यथा एखाद्या मुलीशी लग्न लावून द्या, अशी मागणी त्याने केली. हताश युवकाचे हे निवेदन समाज माध्यमावर व्हायरल झाले आहे.

ठळक मुद्देनिवेदन व्हायरल

लोकमत न्यूज नेटवर्क 

अमरावती : वयाची पस्तीशी गाठूनही नोकरीचा शोध कायम असल्याने हताश झालेल्या सुशिक्षित बेरोजगार युवकाने लग्न लावून देण्याकरिता एका निवेदनाद्वारे चक्क राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच साकडे घातले आहे. एक तर नोकरी (जॉब) द्या, अन्यथा एखाद्या मुलीशी लग्न लावून द्या, अशी मागणी त्याने केली. हताश युवकाचे हे निवेदन समाज माध्यमावर व्हायरल झाले आहे. या निवेदनात आजच्या वस्तुस्थितीला धरून त्या युवकाने जवळजवळ सर्वच सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या व्यथा, भावना व्यक्त केल्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहे.

निवेदनावर अर्जदार म्हणून गजानन राठोड, वाशिम असे नमूद आहे. ‘माझे वय आज ३५ वर्ष झाले असून, आजपर्यंत माझे लग्न झालेले नाही. सात वर्षांपासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. पण, काही ना काही कमी गुणांमुळे मला नोकरी मिळाली नाही. लग्नाच्या अनुषंगाने जिथे मुलगी बघायला जातो, तिथे मुलीवाले - ‘मुलाला नोकरी आहे का?’ असे विचारतात. मुलगा जॉबवर (नोकरीवर) पाहिजे, असे बोलून परत करतात. आपण अजूनपर्यंत नोकरभरती सुरू केलेली नाही. नोकरीच्या जागा काढलेल्या नाहीत. यात जॉब मिळणे कठीण आहे. त्यामुळे आपण मला एक तर जॉब द्यावा, अन्यथा माझे एखाद्या मुलीशी लग्न करून द्यावे’, असे त्या निवेदनात नमूद आहे.

पत्रात लिहिले वास्तव, युवकांचा प्रतिसाद

निवेदनात नमूद हताशा ही सार्वत्रिक आहे. अनेक वर्षांपासून नोकरभरती नाही. सेवानिवृत्त होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. शासकीय सेवेतील अनेक पदे रिक्त आहेत. शिक्षित मुलांचे वय वाढत आहे. शिक्षण असूनही नोकरी नसल्यामुळे युवकांमध्ये नैराश्य पसरले आहे. वधुपक्षाला नोकरीवाला विवाहेच्छुक हवा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या निवेदनाची दखल घेणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया निवेदन व्हायरल करणाऱ्यांसह अचलपूर, परतवाड्यातील अनेक बेरोजगार युवकांनी नोंदविल्या आहेत.

टॅग्स :Socialसामाजिक