NEET ची तयारी करणाऱ्या मुलीला प्रेमाच्या बहाण्याने मागितले 'प्रायव्हेट' फोटो; 'मी प्रेयसी...' म्हणत केली पैशाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 17:04 IST2025-09-20T17:02:54+5:302025-09-20T17:04:28+5:30

बदनामी : ३५ हजार रुपये न दिल्याने दोघांनी केले सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो अपलोड

Girl preparing for NEET asked for 'private' photos on the pretext of love; Demanded money saying 'I am his lover...' | NEET ची तयारी करणाऱ्या मुलीला प्रेमाच्या बहाण्याने मागितले 'प्रायव्हेट' फोटो; 'मी प्रेयसी...' म्हणत केली पैशाची मागणी

Girl preparing for NEET asked for 'private' photos on the pretext of love; Demanded money saying 'I am his lover...'

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
नीटचा अभ्यास करणाऱ्या एका २० वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचे प्रायव्हेट फोटो व व्हिडीओ व्हायरल केल्याची घटना दर्यापूर येथे उघड झाली. जुलै २०२४ ते सप्टेंबर २०२५ दरम्यान तो प्रकार घडला. याप्रकरणी दर्यापूर पोलिसांनी गुरूवारी रात्री दहाच्या सुमारास तेजस कडू (२४, रा. नाचोना, ता. दर्यापूर) व भाग्यश्री (ता. मूर्तिजापूर) विरुद्ध अश्लील फोटो व्हायरल करणे व पैशाची मागणी केल्याचा गुन्हा दाखल केला. ३५ हजार रुपये न दिल्याने दोघांनी तिचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले.

एफआयआरनुसार जुलै २०२४ मध्ये पीडिता ही अकोला येथे नीट परीक्षेचा अभ्यास करीत होती. त्यावेळी तेजसशी तिची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दरम्यान, ती खोलीवर असताना आरोपीने तिला तिचे प्रायव्हेट फोटो व सेल्फीची मागणी केली. तरुणीनेदेखील विश्वास ठेवत त्याला व्हिडीओ कॉल केला. नेमक्या त्याचवेळी आरोपीने त्या व्हिडीओचा स्क्रीन शॉट व व्हिडीओदेखील काढला. काही दिवसानंतर भाग्यश्रीने तिला कॉल केला.

ती म्हणाली, मी प्रेयसी...

आपण तेजसशी प्रेयसी असून, तू ३५ हजार रुपये पाठव अन्यथा ते फोटो व व्हिडीओ व्हायरल करेन, अशी धमकी तिला दिली. पीडिताने पैसे न पाठवता नकार दिला असता दोन्ही आरोपींनी तिचे खासगी फोटो व व्हिडीओ व्हॉट्सअॅपवर व इन्स्टाग्राम आयडीवर व्हायरल केले. त्यामुळे समाजात तिची मोठी बदनामी झाली. ती बाब लक्षात येताच तरुणीने दर्यापूर पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. मात्र, घटनास्थळ हे अकोला असल्याने या गुन्ह्याची केस डायरी तेथे पाठविण्यात आली. अकोला पोलिस तपास करतिल.
 

Web Title: Girl preparing for NEET asked for 'private' photos on the pretext of love; Demanded money saying 'I am his lover...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.