शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा तहसीलदारांना घेराव

By admin | Updated: March 14, 2015 00:38 IST

अतिवृष्टीते खचलेल्या विहिरींची प्रकरणे शासनाने मंजूर करुनसुध्दा अद्यापही कामे सुरु झाली नाहीत. यामुळे काम तातडीने सुरू करण्यात यावे,

वरुड : अतिवृष्टीते खचलेल्या विहिरींची प्रकरणे शासनाने मंजूर करुनसुध्दा अद्यापही कामे सुरु झाली नाहीत. यामुळे काम तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तहसीलदार बाळासाहेब तिडके यांना घेराव घालण्यात आला. सन् २०१२ -२०१३ व २०१३ -२०१४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे वरूड तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या विहिरी खचलेल्या आहेत. खचलेल्या विहिरीसंदर्भात शासनाने विशेष बाब म्हणून महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीतून गाळ काढणे, विहिरीचे बांधकाम करणे याकरिता रोजगार हमी योजने अंतर्गत बांधकामास पात्र एक हजार ५०० विहिरींना बांधकामाची मंजुरी दिली. पात्र ठरलेल्या खचलेल्या विहिरींना चार महिन्यंचा कालावधी लोटूनसुद्धा प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही. विहीर उपसण्याकरिता व बांधकाम करण्यासाठी शासनाने अद्यापही मंजुरात दिली नाही. विहीर बांधकामाचा कालावधी हा एप्रिल ते जूनपर्यंत असतो. या महिन्यात विहिरीची पातळी खोलवर जात असल्यामुळे गाळ उपसणे, बांधकाम करणे व याकरिता मंजुरी मिळणे सोयीचे होते. परंतु पंचायत समितीच्या व जिल्हा परिषदेच्या अडेलतट्टु धोरणामुळे व दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना योजनेपासून वंचित राहण्याची पाळी आलेली आहे. सत्य परिस्थिती पाहिल्यास वरूड तालुका हा ड्रायझोन असल्यामुळे नवीन विहीर खोदण्यास शासन परवानगी देत नाही आणि दुसरीकडे मंजूर झालेल्या विहिरींचे बांधकाम करण्यास परवानगीसुद्धा देत देत नाही. अतिवृष्टीमुळे खचलेल्या विहिरींमध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांचे उभे पीक अतिरिक्त पाण्यामुळे जागेवरच सडत आहे. शेतकऱ्यांचे मोटरपंप व पाईपसुद्धा विहिरीमध्ये दबल्यामुळे ते सडण्याच्या अवस्थेत आले आहेत. (तालुका प्रतिनिधी)