शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

सोलर पंपांसाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2016 00:25 IST

जिल्ह्यात सोलर पंप वीज जोडणीसाठी शासनाकडूम 35 हजार रूपये अनुदान दिले जाते ...

पालकमंत्री : महावितरण कंपनीची आढावा बैठक अमरावती : जिल्ह्यात सोलर पंप वीज जोडणीसाठी शासनाकडूम 35 हजार रूपये अनुदान दिले जाते व सौरऊर्जेवर चालत असल्यामुळे सोलर पंपाची उपयुक्तता तुलनेने जास्त आहे. म्हणून शेतकऱ्यांनी सोलर पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे व याबाबतीत जनजागृती करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिलेत.जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी आयोजित महावितरण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता गाडीकर, कार्यकारी अभियंता मोहोड यांच्यासह सर्व जिल्ह्यातील महावितरणचे अधिकारी उपस्थित होते. १७०० सोलर पंपांसाठी जिल्ह्यात मान्यता मिळाली असून फक्त ४८६ शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहे. सोलरपंपांना जिल्ह्यात मिळालेली मान्यता व आलेले अर्ज यामध्ये तफावत असून त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जिल्ह्यामध्ये आतापर्यत १२ हजार कृषीपंपाचे कनेक्शन दिले असून कृषीपंपांच्या प्रलंबित कनेक्शनची संख्या कमी करण्यामध्ये यश आल्याबाबत पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. यावर्षी रबी हंगामात शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत सुरु राहावा, म्हणून २०० अतिरिक्त डीबींची मागणी केली आहे व ४०० डीबींची साठवण करुन ठेवली आहे. शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देणे हे शासनाचे प्राधान्य असुन अमरावती स्मार्ट सिटीसाठी १३०कोटी रुपयाचा स्मार्ट ग्रिड आराखडा शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यामधून भूमिगत वीज कनेक्शन जोडण्यासाठी भुयारी मागार्चा वापर करण्यात येणार आहे. इन्फ्रा २ टप्प्याच्या कामाची माहिती देखील पालकमंत्र्यांनी घेतली. यावेळी अचलपूर विभागात कृषीपंपांचे वाटप करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. पथदिवे व पाणीपुरवठ्याचे कनेक्शनही लवकर देण्याचे, ग्राहकांचे तक्रारी वेळेत सोडविण्याचे, व मुख्यालयी थांबण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिलेत (प्रतिनिधी)