शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

शहीद कैलासवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 5:00 AM

नागपूरहून २७ डिसेंबरला दुपारी २ वाजताच्या दरम्यान कैलास दहीकर यांचे पार्थिव पिंपळखुटा येथे दाखल झाले. तत्पूर्वी परतवाडा शहरासह मार्गातील धोतरखेडा, एकलासपूर, धामणगाव गढी येथील आबालवृद्धांनी हातात तिरंगा घेत मार्गावर उभे राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. पिंपळखुटा गावासह देवगाव परिसरात प्रत्येक घरापुढे रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सर्वप्रथम पिंपळखुटा येथील त्यांच्या निवासस्थानी पार्थिव नेण्यात आले. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टररूपी रथावर ठेवून ते अंत्यसंस्कार स्थळी आणले गेले.

ठळक मुद्देसैन्य दल, पोलिसांकडून मानवंदना, ‘अमर रहे’ च्या गगनभेदी घोषणा, पंचक्रोशीतून उसळला जनसागर

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील सैनिक कैलास दहीकर यांच्या पार्थिवावर देवगाव शिवारात सातपुडा पर्वताच्या साक्षीने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडला. या दरम्यान सैन्य दलासह राज्य पोलीस दलाकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. मेळघाटच्या पंचक्रोशीतून याप्रसंगी जनसागर उसळला होता. ‘अमर रहे, अमर रहे’, ‘भारत माता की जय’च्या गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.नागपूरहून २७ डिसेंबरला दुपारी २ वाजताच्या दरम्यान कैलास दहीकर यांचे पार्थिव पिंपळखुटा येथे दाखल झाले. तत्पूर्वी परतवाडा शहरासह मार्गातील धोतरखेडा, एकलासपूर, धामणगाव गढी येथील आबालवृद्धांनी हातात तिरंगा घेत मार्गावर उभे राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.पिंपळखुटा गावासह देवगाव परिसरात प्रत्येक घरापुढे रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सर्वप्रथम पिंपळखुटा येथील त्यांच्या निवासस्थानी पार्थिव नेण्यात आले. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टररूपी रथावर ठेवून ते अंत्यसंस्कार स्थळी आणले गेले.दत्तप्रभू आश्रमशाळेमागील गजानन येवले यांच्या शेतात शासकीत इतमामात कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले. ज्या तिरंग्यात त्यांचे पार्थिव आणले गेले, तो सैन्यदलाकडून त्यांची पत्नी बबली यांच्या स्वाधीन करण्यात आला. आई, वडील, पत्नी, भाऊ, मुलगीसह नातेवाइकांनी त्यांचे मुखदर्शन घेतले. लहान भाऊ केवल दहीकर याने कैलासच्या पार्थिवाला अग्नी दिला.तत्पूर्वी, राज्य शासनाच्यावतीने पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी, तर प्रशासनाच्यावतीने उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी पुष्पचक्र अर्पण केले. राज्यमंत्री बच्चू कडू, मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, माजी आमदार केवलराम काळे, खासदार नवनीत राणा, जिल्हा परिषद सदस्य प्रताप अभ्यंकर, बहादुर आजी-माजी सैनिक संघ, देवगावचे सरपंच गजानन येवले, सुरेखा ठाकरे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण केले. अखेर राष्ट्रगीतासह ‘अमर रहे’च्या जयघोषाने शहीद कैलास दहीकर यांना निरोप देण्यात आला. याप्रसंगी महिलांसह शालेय विद्यार्थी उपस्थित होते. 

वीरपत्नीला तिरंगा कैलास यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पिंपळखुटा गावालगतच्या मैदानावर सरण रचण्यात आले. त्यावेळी पत्नी बबली दहीकर यांना  सैन्यदलातर्फे सन्मानपूर्वक तिरंगा प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्या धाय मोकलून रडल्या. कैलास यांचे बंधू केवल यांनी शहीदाच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. यावेळी राष्ट्रगीत सादर होऊन सर्व उपस्थितांनी वीर हुतात्म्याला वंदन केले. गावकऱ्यांनी रांगोळीच्या माध्यमातून लाडक्या ‘फौजी’ला श्रद्धांजली वाहिली.

भूमीचा गौरव  कैलास दहीकर यांना कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. भारतमातेच्या या सुपुत्राने येथील भूमीचा गौरव वाढवला आहे. दहीकर कुटुंबाची जबाबदारी ही आमची जबाबदारी आहे. आम्ही या कुटुंबाला सर्वतोपरी साहाय्य करू, असे मत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले.

बलिदान प्रेरणादायीशहीद कैलास दहीकर यांचा त्याग व बलिदान सर्वांना प्रेरणा देणारे आहे, अशी भावना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केली. खासदार नवनीत राणा, पिंपळखुट्याचे सरपंच गजानन येवले यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले.

 

टॅग्स :SoldierसैनिकDeathमृत्यू