कांडली येथील आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी निधी हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:11 IST2021-07-21T04:11:19+5:302021-07-21T04:11:19+5:30
परतवाडा लोकमत न्यूज नेटवर्क नरेंद्र जावरे मागील चार वर्षापासून मेळघाट विधानसभा मतदार संघातील अचलपूर तालुक्याच्या कांडली येथील मंजूर प्राथमिक ...

कांडली येथील आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी निधी हवा
परतवाडा लोकमत न्यूज नेटवर्क नरेंद्र जावरे
मागील चार वर्षापासून मेळघाट विधानसभा मतदार संघातील अचलपूर तालुक्याच्या कांडली येथील मंजूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार राजकुमार पटेल यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली तर दुसरीकडे कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्हा परिषद परत पाठवीत असल्याची खंत पत्रातून व्यक्त केली
जिल्ह्यातील मोठया ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या कांडली गाव व परिसराची लोकसंख्या ३० हजार आहे २०१७ मध्ये येथे अंबाडा मार्गावर प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले जिल्हा परिषदेत ठराव सुद्धा पाठविला होता असे असताना आरोग्य केंद्र इमारतीच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागत असल्याची गंभीर चित्र असल्याचे मत मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र देऊन निधीची मागणी केली, कांडली जिल्हा परिषद मतदार संघ असून ग्रामपंचायत आहे अंबाडा कंडारी मार्गावर आरोग्य केंद्राकरिता जागा उपलब्ध आहे. तसेच सदर कांडली प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण करिण्याकरिता सन २०१७ मध्ये जि.प. व शासनाने मान्यता दिलेली आहे.
बॉक्स
दोन कोटीचा निधी अखर्चित
एकीकडे मेळघाट मतदार संघातील आरोग्य सेवेकरिता शासनाकडून प्राप्त २ कोटी १८ लक्ष रुपयाचा निधी अखर्चित राहील्यामुळे अमरावती जिल्हा परिषद शासनास परत पाठवित असल्याचे चित्र आहे. परंतु दुसरीकडे मेळघाट मतदार संघातील कांडली ग्राम पंचायती अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राला निधी उपलब्ध करुन देत नसल्याची खंत असल्याचे मंत्र्यांना दिलेल्या पत्रात आमदार पटेल यांनी म्हटले आहे
200721\img-20210710-wa0084.jpg
फोटो काडली ग्रामपंचायत