बिल्डरपुत्राच्या चारचाकीने दोघांना उडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 01:10 IST2018-09-28T01:10:02+5:302018-09-28T01:10:29+5:30
एका बिल्डरपुत्राच्या चारचाकी वाहनाने ठोकरल्याने दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर वाहन घेऊन पळण्याच्या बेतात असलेल्या त्या बिल्डरपुत्राला काही प्रत्यक्षदर्शींनी बेदम चोप दिला. त्यावेळी त्याने हवेत गोळीबार केल्याची चर्चा आहे.

बिल्डरपुत्राच्या चारचाकीने दोघांना उडविले
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : एका बिल्डरपुत्राच्या चारचाकी वाहनाने ठोकरल्याने दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर वाहन घेऊन पळण्याच्या बेतात असलेल्या त्या बिल्डरपुत्राला काही प्रत्यक्षदर्शींनी बेदम चोप दिला. त्यावेळी त्याने हवेत गोळीबार केल्याची चर्चा आहे.
अपघातानंतर रिव्हॉल्व्हर व रोकड हरविल्याची तक्रार त्या बिल्डरपुत्राने नोंदविल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा अपघात साईनगर रस्त्यावरील शीतलामाता मंदिराजवळ २६ सप्टेंबर रोजी रात्री ११.४५ च्या सुमारास घडला. नितीन गंगाधर सावरकर (४४, हनुमान मंदिराजवळ, रविनगर) यांनी गुरुवारी सकाळी ६ च्या सुमारास तक्रार नोंदविली. तक्रारीनुसार, त्यांच्यासह मित्र जगदीश परांजपे हे एमएच २७ एएल ६०५३ क्रमांकाच्या दुचाकीने सातुर्ण्याकडून रविनगरकडे जात होते. त्याचवेळी मंदिराजवळ एमएच २७ बीयू २७ या क्रमांकाच्या चारचाकीने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. वाहनचालकाने सावरकर यांच्याशी वाद घातला. काहींनी त्यास चोप दिल्यावर त्या बिल्डरपुत्राने हवेत गोळी चालविली. या गोंधळात चारचाकी वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. राजापेठ पोलिसांनी त्या बिल्डरपुत्राचे वाहन जप्त केले.