शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे माजी खासदार अडसूळ, मुलगा, जावयाकडे ईडीच्या धाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 07:17 IST

सिटी बँक घोटाळा प्रकरण; निवासस्थानांचीही झाडाझडती

ठळक मुद्देआनंदराव अडसूळ यांनी सिटी बँकेत भ्रष्टाचार केला असून सर्वसामान्य ठेवीदार, गोरगरीब नागरिक, ज्येष्ठ पेन्शनधारक यांची आयुष्यभराची जमा रक्कम, गिरणी कामगारांचे पैसे परस्पर लाटल्याचा आरोप ईडीकडे नोंदविलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह त्यांचा माजी आमदार मुलगा व जावई यांची निवासस्थाने तसेच कार्यालयांवर एकूण सहा ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी धाडसत्र राबविले. मुंबई येथील सिटी बँकेत ९०० कोटींचा घोटाळा झाल्याप्रकरणी तक्रारीच्या अनुषंगाने ईडीने ही कारवाई केल्याची  माहिती आहे.

आनंदराव अडसूळ यांनी सिटी बँकेत भ्रष्टाचार केला असून सर्वसामान्य ठेवीदार, गोरगरीब नागरिक, ज्येष्ठ पेन्शनधारक यांची आयुष्यभराची जमा रक्कम, गिरणी कामगारांचे पैसे परस्पर लाटल्याचा आरोप ईडीकडे नोंदविलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. त्याआधारे ईडीने बुधवारी अडसुळांसह माजी आमदार तथा बँकेचे संचालक अभिजित अडसूळ व जावई यांची घरे, कार्यालयांची झाडाझडती घेतली. ईडीला चौकशीदरम्यान आर्थिक व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे हाती लागल्याची माहिती आहे. अभिजित हे २००९ मध्ये दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. खातेदार, ठेवीदारांनी तक्रारी केल्या होत्या. 

खासदार नवनीत राणा यांच्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणाची तारीख असली की दरवेळी त्यांचे असे काही ना काही उपद्व्याप सुरू असतात. ते न्यायालयातून लवकरच स्पष्ट होईल. बँकेत गैरव्यवहाराबाबत अगोदर आम्हीच तक्रार केली आहे. लक्ष विचलित करण्यासाठी ईडी चौकशीचा हा फार्स आहे.- अभिजित अडसूळ, माजी आमदार.

मुंबई येथील सिटी बँकेत माजी खासदार यांनी ९०० कोटींचा घाेटाळा केल्याप्रकरणी ईडीकडे आपण स्वत: तक्रार केली होती. त्याअनुषंगाने ईडीने कारवाईचा बडगा उगारला आहे. ठेवीदार, खातेदारांच्या श्रमाची रक्कम बळकावण्याचा हा प्रकार आहे.- रवि राणा, आमदार, बडनेरा

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयShiv SenaशिवसेनाAnandrao Adsulआनंदराव अडसूळ