माजी आमदार पुरुषोत्तम मानकर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 21:52 IST2019-07-03T21:45:21+5:302019-07-03T21:52:07+5:30
माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांचे निकटवर्तीच नव्हे, तर मानसपुत्र अशी त्यांची ओळख होती

माजी आमदार पुरुषोत्तम मानकर यांचे निधन
वरूड (अमरावती) : जुन्या फळीतील काँग्रेस नेते आणि मोर्शी मतदारसंघाचे माजी आमदार पुरुषोत्तम गुलाबराव मानकर यांचे दीर्घ आजाराने अमरावती स्थित काँग्रेसनगर येथील निवासस्थानी बुधवारी निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते.
माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांचे निकटवर्तीच नव्हे, तर मानसपुत्र अशी त्यांची ओळख होती. ४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता गाडेगाव (ता. वरूड) येथील शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याचे धाकटे बंधू तथा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शंकरराव मानकर यांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी माला, मुलगा, मुलगी आणि बराच आप्तपरिवार आहे. पंचायत समिती सदस्य म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे पुरुषोत्तम मानकर यांनी १९८५ ते १९९० दरम्यान मोर्शी विधानसभेचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या माध्यमातून नरखेड रेल्वेला गती मिळाली होती.