मेळघाटात परतणाऱ्या आदिवासींना शिरा अन् खिचडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 12:14 PM2020-03-09T12:14:24+5:302020-03-09T13:45:10+5:30

रोजगाराच्या शोधात चार महिन्यांपूर्वी स्थलांतरित झालेले आदिवासी होळी सणानिमित्त गावी परतू लागले आहेत. या शेकडो आदिवासींना परतवाड्यात दररोज खिचडी आणि शिरा मोफत वाटप करण्यात येत आहे.

Food for tribals returning to Melghat | मेळघाटात परतणाऱ्या आदिवासींना शिरा अन् खिचडी

मेळघाटात परतणाऱ्या आदिवासींना शिरा अन् खिचडी

googlenewsNext
ठळक मुद्देछोट्या दुकानदारांचा माणुसकीचा उपक्रमचार दिवसांत दहा क्विंटलची खिचडी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रोजगाराच्या शोधात चार महिन्यांपूर्वी स्थलांतरित झालेले आदिवासी होळी सणानिमित्त गावी परतू लागले आहेत. या शेकडो आदिवासींना परतवाड्यात दररोज खिचडी आणि शिरा मोफत वाटप करण्यात येत आहे. शहरातील किरकोळ व्यावसायिकांच्या सामाजिक उपक्रमाचे हे चौथे वर्षे आहे.
मेळघाटात रोजंदारीची कामे आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध नसल्याने हजारो आदिवासींनी दिवाळीनंतर नेहमीप्रमाणे बड्या शहरांत स्थलांतर केले होते. होळी हा त्यांचा सर्वात मोठा सण आहे. त्यानिमित्त वर्षभर कुठेही असले तरी ते या दिवसांत गावी परततात. जत्थाने ते परतवाडा मार्गे चिखलदरा वा धारणी तालुक्यातील त्यांच्या गावात जातात. त्यांना परतवाडा शहरातील चिखलदरा स्टॉपनजीक सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृहातील पटांगणावर सन्मानाने खिचडी आणि गोड शिरा वाटप केला जात आहे. त्यासाठी भव्य मंडपही उभारण्यात आला आहे. येथील गौरव कान्हेरकर, प्रशांत कान्हेरकर, देवेंद्र अर्डक, राजेश डांगे, अंकुश इंगळे, मनोज पोटे, भालचंद्र जाधव, नितेश किल्लेदार, विजय चºहाटकर, रुपेश कलाने, राजीक भाई, अशपाक भाई, महादेव धुर्वे आदींनी स्ववर्गणीतून हा उपक्रम राबविला आहे,

दहा क्विंटलची खिचडी
शुक्रवारपासून दररोज दोन क्विंटल तांदळाची खिचडी आणि ५० किलो रव्याचा शिरा तयार केला जात आहे. बारलिंगे कॉम्प्लेक्स मित्रमंडळीतर्फे शुक्रवार ते सोमवार, असे सलग चार दिवस ही भोजनाची मोफत व्यवस्था केली आहे. सलून, झेरॉक्स, कार डेकोरेशन मोबाईल शॉपी अशा लहान दुकानदारांचा हा उपक्रम आहे. जवळपास १० क्विंटलची खिचडी लागणार असल्याचा अंदाज आयोजकांनी वर्तविला आहे.

Web Title: Food for tribals returning to Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Melghatमेळघाट