अमरावतीतील अतिशिकस्त इमारत कोसळली, पाच जण जागीच ठार
By प्रदीप भाकरे | Updated: October 30, 2022 17:20 IST2022-10-30T17:19:29+5:302022-10-30T17:20:19+5:30
अमरावतीतील अतिशिकस्त इमारत कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

अमरावतीतील अतिशिकस्त इमारत कोसळली, पाच जण जागीच ठार
अमरावती : स्थानिक प्रभात चौकस्थित राजेंद्र लॉजची दुमजली इमारतीचे छत कोसळून तळमजल्यावरील दुकानाच्या व्यवस्थापकासह चार मजुरांचा दबून मृत्यू झाला. रविवारी दुपारी ४.३० च्या सुमारास व्यवस्थापकाचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर मदतकार्य थांबविण्यात आले. त्यापुर्वी मलम्याखाली दबलेले चार मृतदेह एनडीआरएफच्या टीमने बाहेर काढले. रविवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.
रवी परमार (४२, साईनगर) असे मृत व्यवस्थापकाचे नाव आहे. तर, मो. कमर उर्फ कम्मू इक्बाल मो. रफिक (३५, रहमतनगर), मो. आरिफ शेख रहिम (३५, रा. रहमतनगर) व रिजवान शाह शरिफ शेख (२०, उस्माननगर, लालखडी) असे मृत मजुरांची नावे आहेत. तर अन्य एक मृत मजुराची ओळख पटू शकली नाही. घटनास्थळी खा. नवनीत राणा यांनी भेट दिली. तर पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, महापालिकेच्या उपायुक्त भाग्यश्री बोरेकर आदींनी यंत्रणेला निर्देश दिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"