पाच वर्षांत पहिल्यांदाच सर्वाधिक पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 05:00 AM2020-09-28T05:00:00+5:302020-09-28T05:00:25+5:30

यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना १,७२० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्षांक देण्यात आले होते. त्यातुलनेत बँकांनी १,०६,१०४ शेतकऱ्यांना ९४४.८० कोटींचे वाटप मागील आठवड्यापर्यंत केले आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांना ११७७.६० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्षांक होते. त्यातुलनेत आतापर्यंत ६१,१४८ शेतकºयांना ६२७.४१ कोटींचे पीककर्ज वाटप करण्यात आले. ही ५३ टक्केवारी आहे.

For the first time in five years, the highest peak debt allocation | पाच वर्षांत पहिल्यांदाच सर्वाधिक पीककर्ज वाटप

पाच वर्षांत पहिल्यांदाच सर्वाधिक पीककर्ज वाटप

Next
ठळक मुद्दे५५ टक्के प्रमाण : ऑक्टोबरपासून रबी कर्जवाटपाची प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पाच वर्षांच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात सर्वाधिक ५५ टक्के पीक कर्जवाटप करण्यात आलेले आहे. यंदा जुलैअखेरपासून जिल्ह्यात ७५० कोटींची कर्जमाफी झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला. परिणामी कर्जवाटपाचा टक्का वाढला व अंतिम अहवाल येईपर्यंत यामध्ये पुन्हा दोन ते तीन टक्के वाढ होणार असल्याचे सहकार विभागाने सांगितले.
साधारणपणे एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान खरीप व ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत रबीचे पीककर्ज वाटप होत असते. जिल्ह्यात कर्जमाफीची प्रक्रिया मार्च महिन्यांपासून स्थगित केली होती.
अमरावती जिल्ह्यातील ५२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्याने आयोगाने कर्जमाफीची प्रक्रिया थांबविली होती. त्यामुळे खरीप हंगामात जुलै अखेरपावेतो फक्त २३ टक्केच कर्जवाटप झाले होते. मात्र, त्यानंतर ७५० कोटींची कर्जमाफी झाल्याने दोन महिन्यात ३० ते ३२ टक्के कर्जवाटप झाले.
यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना १,७२० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्षांक देण्यात आले होते. त्यातुलनेत बँकांनी १,०६,१०४ शेतकऱ्यांना ९४४.८० कोटींचे वाटप मागील आठवड्यापर्यंत केले आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांना ११७७.६० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्षांक होते. त्यातुलनेत आतापर्यंत ६१,१४८ शेतकºयांना ६२७.४१ कोटींचे पीककर्ज वाटप करण्यात आले. ही ५३ टक्केवारी आहे.
ग्रामीण बँकांना १४.४० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्षांक असताना प्रत्यक्षात १५.४७ कोटींचे वाटप केले, ही १०७ टक्केवारी आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेला ५२८ कोटींच्या वाटपाचे लक्ष्यांक असताना प्रत्यक्षात ४३,६६८ खातेदारांना ३०१.९२ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले ही ५७ टक्केवारी आहे. यंदा कर्जमाफीनंतर कर्जवाटपाचा टक्का गत दोन महिन्यात वाढला आहे.

नियमित कर्जदारांना कर्जमाफीचा लाभ केव्हा?
जिल्ह्यातील ३५ ते ४० हजार शेतकरी हे बँकांचे नियमित कर्जदार आहे. यापूर्वी झालेल्या कर्जमाफीतही त्यांना लाभ मिळालेला नाही त्यामुळे यंदाच्या कर्जमाफीमध्ये त्यांना लाभ मिळणार असल्याचे शासनाद्वारा वारंवार सांगण्यात आले. या आशेपोटी बहुतांश नियमित कर्जदारांनी यंदा कर्जाचा भरणा केलेला नाही. त्यामुळे हे सर्व शेतकरी थकबाकीदार झालेत व त्यांना कर्ज मिळू शकलेले नाही. कर्जमाफीमध्येही प्रोत्साहनपर लाभदेखील मिळालेला नाही. या सर्व नियमित खातेदारांनाही कर्जमाफीचा लाभ देण्याची मागणी होत आहे.

बँकानिहाय कर्जवाटपाची स्थिती
अलाहाबाद बँक ९.२१ कोटी, आंध्रा ८४ लाख, बँक ऑफ बडोदा २१.९७ कोटी, बँक ऑफ इंडिया १९.३५ कोटी, बँक ऑफ महाराष्ट्र १८५ कोटी, कॅनरा ५.१० कोटी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया १२१.१० कोटी, कार्पोरेशन १३ लाख, इंडियन बँक ८.२४, पंजाब नॅशनल ३ कोटी, युनियन बँक ३९.७५ कोटी, एसबीआय १६८.४१ कोटी, युको बँक ३.०२ कोटी, अ‍ॅक्सिस १० कोटी, आयडीबीआय १.९४ कोटी, एचडीएफसी १७.३९ कोटी, आयसीआयसीआय ३.८० कोटी, रत्नाकर २० लाख, विदर्भ कोकन बँक १५.४७ कोटी व जिल्हा बँकेद्वारा ३०१.९२ कोटींचे पीककर्जवाटप करण्यात आलेले आहे.

Web Title: For the first time in five years, the highest peak debt allocation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.