शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 05:38 IST

नवसारी टी पाॅइंट ते चांगापूर फाट्यादरम्यान शनिवारी सायंकाळी ५:३० च्या सुमारास हा रक्तरंजित थरार घडला. अंगावर शस्त्राने भोसकल्याचे तब्बल १२ पेक्षा अधिक खोल घाव आहेत.

अमरावती : वलगाव पोलिस ठाण्यात कार्यरत सहायक उपनिरीक्षक अब्दुल कलाम अब्दुल कदीर (५६, रा. जमील काॅलनी) यांना मागून कारने धडक देऊन त्यानंतर चाकूने भोसकून खून करण्यात आला. नवसारी टी पाॅइंट ते चांगापूर फाट्यादरम्यान शनिवारी सायंकाळी ५:३० च्या सुमारास हा रक्तरंजित थरार घडला. अंगावर शस्त्राने भोसकल्याचे तब्बल १२ पेक्षा अधिक खोल घाव आहेत.

पोलिस सूत्रांनुसार, अब्दुल कलाम सायंकाळी दुचाकीने वलगाव ठाण्यात कर्तव्यावर जात होते. नवसारी टी पॉइंटजवळ रेकी करीत उभ्या असलेल्या आरोपींनी भरधाव कार मागून कलाम यांच्या दुचाकीवर घातली. कारने अनेकदा धडक दिली. त्यामुळे कलाम हे रक्तबंबाळ स्थितीत कोसळले. ते कोसळताच अज्ञात आरोपींनी त्यांच्या सर्वांगावर धारदार शस्त्राने घाव घातले, असा घटनाक्रम समोर आला आहे. आरोपींची कार जप्त करण्यात आली असून या प्रकरणी दोन संशयितांनाही ताब्यात घेण्यात आले.

मुुलगी शनिवारीच बनली फिजिओथेरपिस्ट : अब्दुुल कलाम यांच्या मुलीने शनिवारीच फिजिओथेरपिस्टची परीक्षा उत्तीर्ण केली. त्या आनंदात कलाम यांनी दुपारी पोलिस ठाण्यात पेढे वाटले होते.

वादातून खून?: २१ जूनला एहसानउद्दीन सिराजउद्दीनच्या तक्रारीवरून कलाम यांचे भाऊ अ. सलाम व अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्या पैशांच्या व्यवहाराच्या वादातून अ. कलाम यांना संपविल्याची प्राथमिक माहिती आहे.

अतिशय धक्कादायक व भीषण घटना आहे. कलाम यांच्या शरीरावरील अनेक घाव पाहता प्रथमदर्शनी त्यांची हत्या करण्यात आली असावी.

अरविंद चावरिया, पोलिस आयुक्त

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी