आधी व्हिडिओ शूट, मग हाताची नस कापली; २८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

By प्रदीप भाकरे | Updated: March 10, 2026 18:15 IST2026-03-10T18:14:36+5:302026-03-10T18:15:16+5:30

Amravati : बडनेरा नवीवस्तीमधील झिरी परिसरात राहणाऱ्या सौरव संजू भारती (२८, रा. मनोहर टाॅवर) या तरुणाने मंगळवारी (दि. १०) सकाळी आपल्या राहत्या घरात टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.

First he shot a video, then he cut his arm vein; 28-year-old youth commits suicide by hanging | आधी व्हिडिओ शूट, मग हाताची नस कापली; २८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

First he shot a video, then he cut his arm vein; 28-year-old youth commits suicide by hanging

अमरावती: बडनेरा नवीवस्तीमधील झिरी परिसरात राहणाऱ्या सौरव संजू भारती (२८, रा. मनोहर टाॅवर) या तरुणाने मंगळवारी (दि. १०) सकाळी आपल्या राहत्या घरात टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. विशेष म्हणजे, आत्महत्येपूर्वी सौरवने एक व्हिडिओ तयार केला, त्यानंतर स्वतःच्या हाताची नस कापली आणि अखेर गळफास लावून आपली जीवन संपवले. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सौरव हा मागील काही महिन्यांपासून वैयक्तिक कारणांमुळे घरातच राहत होता आणि त्याने घराबाहेर जाणे पूर्णपणे बंद केले होते. घटनेच्या वेळी सौरवचे आई, भाऊ आणि बहीण नाशिकला गेले होते, तर रेल्वेमध्ये लोको पायलट असलेले वडील संजू भारती रात्री ड्युटी संपवून घरी परतले होते. वडील दुसऱ्या खोलीत झोपले असताना, सौरवने आपल्या खोलीत हा थरार घडवून आणला.

​मिळालेल्या माहितीनुसार, सौरवने आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला, ज्यामध्ये त्याने आपल्या निर्णयाची माहिती दिली होती. त्यानंतर त्याने धारदार शस्त्राने स्वतःच्या हाताची नस कापून घेतली. एवढ्यावरच न थांबता त्याने पंख्याला गळफास लावून घेतला. रात्री घरचे लोक झोपेत असल्याने ही बाब कोणाच्याही लक्षात आली नाही. मंगळवारी सकाळी सौरव गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्यांनी एकच हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले होते.

Web Title : वीडियो शूट करने के बाद 28 वर्षीय युवक ने की आत्महत्या

Web Summary : अमरावती में 28 वर्षीय सौरभ भारती ने घर पर आत्महत्या कर ली। उसने एक वीडियो रिकॉर्ड किया, अपनी नस काटी और फिर फांसी लगा ली। परिवार को अगली सुबह उसका शव मिला। पुलिस जांच कर रही है; बताया जा रहा है कि वह व्यक्तिगत समस्याओं से जूझ रहा था और खुद को अलग कर रहा था।

Web Title : 28-Year-Old Dies by Suicide After Recording Video, Cutting Wrist

Web Summary : In Amravati, a 28-year-old man, Saurav Bharti, tragically ended his life at home. He recorded a video, cut his wrist, and then hanged himself. Family members discovered his body the next morning. Police are investigating the cause; he was reportedly dealing with personal issues and isolating himself.