शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच दिवशी ‘सीएस’ने केले शवविच्छेदन

By admin | Updated: July 5, 2014 00:26 IST

जिल्हा सामान्य रूग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक पदाची धुरा शुक्रवारी सांभाळल्यानंतर ...

अमरावती : जिल्हा सामान्य रूग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक पदाची धुरा शुक्रवारी सांभाळल्यानंतर अरूण राऊत यांनी पहिल्याच दिवशी शवविच्छेदन केल्याने हा सामान्य रूग्णालय परिसरात चर्चेचा विषय ठरला होता.रुजूू होण्याच्या पहिल्याच दिवशी शवविच्छेदनगृहात जाऊन शवविच्छेदन करणारे ते पहिले अधिकारी आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ येणाऱ्या रुग्णांना तत्पर आरोग्य सेवा प्रदान करण्याचे उद्दिष्ट घेऊन ते पदावर रुजू झाले आहेत. त्यांच्या कार्यकाळात रुग्णालयीन व्यवस्था सुधारण्याची चिन्हे दिसून येत असल्याच्या प्रतिक्रिया कर्मचारी व रूग्णांमध्ये उमटत आहेत. गेल्या काही वर्षांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयातील गैरसोईमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रूग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यास रुग्णालयीन व्यवस्था तोकडी पडत आहे. तसेच अस्वच्छता, सीटी स्कॅन मशिन बंद व कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा अशा एक ना अनेक समस्या आहेत. रघुनाथ भोये यांच्या जागी रुजू झालेल्या अरूण राऊत यांच्यापुढे अनेक आव्हाने आहेत.यापूर्वी नांदेड जिल्ह्यातील गोकुंदा येथे उपजिल्हा रुग्णालयात त्यांनी वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यभार सांभाळला आहे. गुरुवारी सायंकाळी त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा शल्य चिकीत्सक पदाची धुरा हाती घेतली. शुक्रवारी सकाळपासूनच त्यांनी आपल्या कामाची तत्परता दाखविली. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपामुळे अरुण राऊत यांनी स्वत: मृतदेहाचे शवविच्छेदन केले.