५८ प्राथमिक आरोग्य केंद्रांतील अग्निशमन यंत्रणा रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:12 IST2021-01-17T04:12:02+5:302021-01-17T04:12:02+5:30
सुरक्षितता धोक्यात: अग्निशमन यंत्रणा अन् विजेचे ऑडिट ! अमरावती : जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्याच्या दृष्टीने ५८ प्राथमिक आरोग्य ...

५८ प्राथमिक आरोग्य केंद्रांतील अग्निशमन यंत्रणा रामभरोसे
सुरक्षितता धोक्यात: अग्निशमन यंत्रणा अन् विजेचे ऑडिट !
अमरावती : जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्याच्या दृष्टीने ५८ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अग्निशमन यंत्रणा नाही. त्यामुळे जिल्हाभरातील ५८ प्राथमिक आरोग्य केंद्रातील खबरदारीच्या उपाययोजना रामभरोसे असल्याचे वास्तव आहे.
जिल्ह्यात ५८ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या आरोग्य केंद्रांतर्गत हजारो गावांतील नागरिकांना प्रथमोपचार सेवा दिली जाते. लसीकरणासह इतर शासकीय आरोग्य योजनांची अंमलबजावणी या केंद्रांतील आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांमार्फत केली जाते. या आरोग्य केंद्रांत येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची संख्याही मोठी आहे. जिल्ह्यातील बहुतांश आरोग्य केंद्रांत अग्निशमन यंत्रणेचा अभाव आहे. काही आरोग्य केंद्रांच्या इमारतीची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे तेथील विजेच्या वायरिंगसह इतर अनेक प्रश्न कायम आहेत. भंडारा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर आणि शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा आरोग्य विभागाने संबंधित यंत्रणेकडून फायर ऑडिट, इलेक्ट्रिक ऑडिट वेळेत करून घ्यावेत, अशा सूचना दिल्या आहेत. दरम्यान ज्या बांधकाम विभागाकडे शासकीय इमारतीची ऑडिट करण्याची जबाबदारी आहे. मात्र, हा विभागही याकडे दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी आकस्मिक घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
बॉक्स
तालुकानिहाय आरोग्य केंद्र
जिल्ह्यातील आरोग्य केंद्र - ५८
अमरावती - ४
भातकुली - ३
दर्यापूर - ४
अंजनगाव सुर्जी -३
अचलपूर -३
चांदूर बाजार -५
मोर्शी -५
वरूड -५
तिवसा -३
धामनगाव रेल्वे -४
चांदूर रेल्वे -३
नांदगाव खंडेश्र्वर -५
चिखलदरा -५
धारणी -६
कोट
प्राथमिक आरोग्य केंद्रातील एलेक्ट्रिक ऑडिट, फायर ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट वेळेत करण्याच्या सूचना तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत दिलेल्या आहेत. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- दिलीप रणमले,
जिल्हा आरोग्य अधिकारी