अमरावतीमध्ये टायरच्या गोदामाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 10:26 IST2019-06-06T10:26:36+5:302019-06-06T10:26:57+5:30
गुरुवारी पहाटे ४.४० च्या सुमारास येथील मसानगंज भागात असलेल्या टायरच्या गोदामाला भीषण आग लागली.

अमरावतीमध्ये टायरच्या गोदामाला आग
ठळक मुद्देचार लाखांचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: गुरुवारी पहाटे ४.४० च्या सुमारास येथील मसानगंज भागात असलेल्या टायरच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत आजूबाजूची दोन घरेही जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या सहा फायर टेंडर व फोमच्या साह्याने ही आग नियंत्रणात आणली. यात सुमारे चार लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ही कारवाई अग्निशमनाचे उपकेंद्र प्रमुख सय्यद अन्वर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. आग कशाने लागली याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.