Fire brigade by Assistant Commissioner | सहायक आयुक्तांद्वारा अग्निशमन विभागाची झाडाझडती

सहायक आयुक्तांद्वारा अग्निशमन विभागाची झाडाझडती

ठळक मुद्देसर्व वाहनांवर जीपीएस लावणार : अनुपस्थित कर्मचाऱ्यांना नोटीस

अमरावती : महापालिकेचे सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांनी सोमवारी दुपारी अग्निशमन विभागात आकस्मिक भेट दिली. हजेरी रजिस्टरची तपासणी करून अनुपस्थित नोटीस बजावण्याचे निर्देश त्यांनी दिले.
साहित्य नोंद असणाऱ्या रजिस्टरची तपासणी त्यांनी केली. कॉलवर गाडी गेली असताना सदर ठिकाणचे फोटो काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सर्व वाहनांवर जी.पी.एस. यंत्रणा लावण्याचे निर्देश दिले. कॉल फॉरमॅट शासकीय नियमानुसार ठेवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. सर्व कर्मचाऱ्यांनी गणवेशात उपस्थित राहावे. कॉलवर जाताना सर्व कर्मचाऱ्यानी हेलमेट व गमबुट घालावे. साहित्यासाठी 'रॅक' तयार कराव्या. आवश्यक साहित्य अग्निशमन बळकटीकरण निधीतून घेण्यासाठी प्रस्तावित करावे. अग्निशमन विभागात स्वच्छता अभियान राबवून सदर विभाग स्वच्छ करावा. तीन दिवसांत गोडाऊन साफ करून घ्यावे. या परिसरातील विहिरीलगतच्या सर्व इमारतींचे वॉटर हार्वेस्टिंग करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या परिसरात इतर वाहने उभे राहू न देण्याच्या तसेच गेटसमोर कोणतेही वाहन लावू नये, अशी सक्त ताकिद त्यांनी यावेळी दिली.

 

Web Title: Fire brigade by Assistant Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.