शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

अखेर माजी राज्यमंत्री सुनील देशमुख यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 4:10 AM

मुंबईच्या टिळक भवनात शानदार सोहळा, काँग्रेसच्या दिग्गजांची उपस्थिती अमरावती : माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी सात वर्षांनंतर शनिवारी ...

मुंबईच्या टिळक भवनात शानदार सोहळा, काँग्रेसच्या दिग्गजांची उपस्थिती

अमरावती : माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी सात वर्षांनंतर शनिवारी भाजपला रामराम केला. मुंबई येथील टिळक भवनात आयोजित शानदार सोहळ्यात पुन्हा ते काँग्रेसवासी झालेत. डॉ. देशमुख यांच्या घरवापसीमुळे जिल्ह्यात काँग्रेसमध्ये चैतन्य संचारले आहे.

महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे केंद्रीय महासचिव अविनाश पांडे, महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी काँग्रेस नेत्याच्या उपस्थितीत डॉ. सुनील देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी नाना पटोले यांच्या हस्ते देशमुख यांना पुष्पगुच्छ, दुपट्टा परिधान करून काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित केला.

सन २०१४ मध्ये डॉ. देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. अमरावती मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर ते आमदारदेखील झाले. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. गत काही दिवसांपासून त्यांची भाजपमध्ये घुसमट सुरू होती. स्थानिक भाजप नेत्यांशी त्यांचे फारशे जुळत नव्हते. प्रत्येक राजकीय घडामोडीसाठी डॉ. देशमुख यांना नागपूर येथे विचारावे लागत होते. भाजप सोडण्याचे हेदेखील महत्त्वाचे कारण मानले जात आहे.