शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

पेरणी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 5:00 AM

यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ६ लाख ८८ हजार २७४ हेक्टर क्षेत्र कृषी विभागाने प्रस्तावित केले आहे. यामध्ये धान ५,०६३ हेक्टर, ज्वारी १३,७३२ हेक्टर, मका ११,१६४ हेक्टर, मूग १६,०५४ हेक्टर, उडीद ४,९१७ हेक्टर व भुईमुगाची ४४० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. यामध्ये २ लाख ३९ हजार २२१ हेक्टर क्षेत्रात कपाशीची पेरणी झाली.

ठळक मुद्देपावसाचा लंपडाव सुरूच : खरिपात अडीच लाख हेक्टरमध्ये सोयाबीनचे क्षेत्र

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात सद्यस्थितीत ६ लाख ४२ हजार २०० हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. ही प्रस्तावित क्षेत्राच्या ९३.२१ टक्के आहे. सोयाबीनच्या काही लॉटमध्ये उगवणशक्ती नसल्यामुळे दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर ओढवली. त्या क्षेत्रातही आता पेरणी आटोपली आहे. यंदा सर्वाधिक २.४८ लाख हेक्टरमध्ये सोयाबीन व २.३९ लाख हेक्टरमध्ये कपाशीचे क्षेत्र आहेयंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ६ लाख ८८ हजार २७४ हेक्टर क्षेत्र कृषी विभागाने प्रस्तावित केले आहे. यामध्ये धान ५,०६३ हेक्टर, ज्वारी १३,७३२ हेक्टर, मका ११,१६४ हेक्टर, मूग १६,०५४ हेक्टर, उडीद ४,९१७ हेक्टर व भुईमुगाची ४४० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. यामध्ये २ लाख ३९ हजार २२१ हेक्टर क्षेत्रात कपाशीची पेरणी झाली. यात धारणी तालुक्यात १०,०८९ हेक्टर, चिखलदरा १६२५ हेक्टर, अमरावती १५,८३४ हेक्टर, भातकुली १०,९०० हेक्टर, नांदगाव खंडेश्वर ६,८३६ हेक्टर, चांदूर रेल्वे ६,२८० हेक्टर, तिवसा १७,४५० हेक्टर, मोर्शी २९,८३५ हेक्टर, वरूड ३०,३३८ हेक्टर, दर्यापूर ३५,५३४ हेक्टर, अंजनगाव सुर्जी १६,६०० हेक्टर, अचलपूर १८,८३८ हेक्टर, चांदूर बाजार २०,५८४ व धामणगाव रेल्वे तालुक्यात १९,६७६ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे.जिल्ह्यात सद्यस्थितीत सोयाबीनची २ लाख ४८ हजार ६६७ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. यात धारणी तालुक्यात ८,२०० हेक्टर, चिखलदरा ८,६५० हेक्टर, अमरावती २६,२६३ हेक्टर, भातकुली २४,७०० हेक्टर, नांदगाव खंडेश्वर ४६,६०७ हेक्टर, चांदूर रेल्वे २५,८६६ हेक्टर, तिवसा १७,२०१ हेक्टर, मोर्शी १७,३७८ हेक्टर, वरूड ३,०२२ हेक्टर, दर्यापूर ८,९२८ हेक्टर, अंजनगाव सुर्जी १२,३०० हेक्टर, अचलपूर १०,१५८ हेक्टर, चांदूर बाजार १३,५६८ व धामणगाव रेल्वे तालुक्यात २५,८२५ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे.१० तारखेनंतर पाऊस घटणारसौराष्ट्रावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र तथा ७.६ किमी उंचीवर चक्राकार वारे आहेत. झारखंडवरसुद्धा कमी दाबाचे क्षेत्र आहे आणि ७.६ मिमी उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. गुजरात किनारपट्टी ते केरळ कमी दाबाची द्रोणीय स्थिती कायम आहे. मान्सूनची टर्फरेषा ९ जुलै रोजी हिमालयाचे पायथ्याशी सरकण्याची शक्यता असल्याने १० जुलैनंतर जिल्ह्यासह विदर्भात पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली. ९ ते १० जुलैला काही ठिकाणी विखुरत्या स्वरूपात पाऊस होईल, असे त्यांनी सांगितले.तालुकानिहाय असे आहे क्षेत्रजिल्ह्यात सद्यस्थितीत ६ लाख ४२ हजार २०० हेक्टरमध्ये खरिपाची पेरणी झालेली आहे. यामध्ये धारणी तालुक्यात ३८,४२८ हेक्टर, चिखलदरा १९,९०२ हेक्टर, अमरावती ५१,४७४ हेक्टर, भातकुली ४३९३० हेक्टर, नांदगाव खंडेश्वर ६२,३६२ हेक्टर, चांदूर रेल्वे ३८,५९२ हेक्टर, तिवसा ३९३९० हेक्टर, मोर्शी ५६,८३२ हेक्टर, वरुड ४९,९४१ हेक्टर, दर्यापूर ६८,८७३ हेक्टर, अंजनगाव सुर्जी ३८,०९० हेक्टर, अचलपूर ३८,६२१ हेक्टर, चांदूर बाजार ४२,६७६ व धामणगाव रेल्वे तालुक्यात ५२,९८६ हेक्टरवर पेरणी झाली.

टॅग्स :agricultureशेती