शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
3
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
4
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
5
Operation Sindoor : अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
6
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
7
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
8
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
9
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
10
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
13
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
14
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
15
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
16
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
17
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
18
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
19
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
20
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...

चालू देयक भरा, अन्यथा कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित! महावितरणचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 17:24 IST

महावितरणच्या अमरावती परिमंडळातील कृषिपंप ग्राहकांकडील वाढत्या थकबाकीला आळा घालण्यासाठी चालू देयक न भरणा-या शेतक-यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सोमवारपासून हाती घेण्यात आली आहे.

 अमरावती - महावितरणच्या अमरावती परिमंडळातील कृषिपंप ग्राहकांकडील वाढत्या थकबाकीला आळा घालण्यासाठी चालू देयक न भरणा-या शेतक-यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सोमवारपासून हाती घेण्यात आली आहे. वसुली मोहिमेत परिमंडळाचे मुख्य अभियंता, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याचे अधीक्षक अभियंते तसेच सर्व विभागीय कार्यकारी अभियंते सहभागी होणार आहेत.

अमरावती परिमंडळ अंतर्गत कृषिपंप वीजग्राहकांची थकबाकी वाढल्याने महावितरणसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. वीजक्षेत्रात उधारीचे दिवस संपुष्टात आले असल्याने वीज देयकांची वसुली होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीनेच आता कृषिपंप ग्राहकांच्या वीज बिल थकबाकी वसुलीकडे महावितरणने गांभीर्याने लक्ष पुरविले आहे. एप्रिल आणि जुलै २०१७ मध्ये आकारण्यात आलेले चालू देयके अर्थात दोन त्रैमासिक देयके कृषिपंपधारकांनी न भरल्यास त्यांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करण्याचा निर्णय महावितरण प्रशासनाने घेतला आहे.अमरावती परिमंडळ अंतर्गत अमरावती आणि यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोहीम राबवली जाणार आहे. परिमंडळात एकूण २ लाख ३७ हजार ५०० कृषिपंप वीज ग्राहकांकडे जून २०१७ अखेर १ हजार ४३२ कोटी ४२ लाखांची थकबाकी आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील १ लाख २५ हजार ५७० ग्राहकांकडे ६७४ कोटी ३४ लाख, तर यवतमाळ जिल्ह्यातील १ लाख ११ हजार ९७२ ग्राहकांकडे ७५८ कोटी ७ लाख रुपये थकबाकी आहे.  थकबाकीदार कृषिपंपधारकांनी चालू वर्षातील दोन त्रैमासिक वीज देयके त्वरित भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन अमरावती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी यांनी केले.

अमरावती जिल्ह्यात चार विभागांतील थकबाकीदार                           अमरावती शहर विभाग                     ९४१                           ५ कोटी ३४ लाखअमरावती ग्रामीण  विभाग              ४१,८१०                       १३९  कोटी ८३ लाखअचलपूर  विभाग                          ४०,०४२                        ३४८ कोटी  ९२ लाख ९३ हजारमोर्शी विभाग                                ४२,७७७                       १८० कोटी २४ लाख ८२ हजारयवतमाळ जिल्ह्यातील तीन विभागांतील थकबाकीदारयवतमाळ विभाग                       ३५,७७०                          २१२  कोटी ३८ लाख ३२ हजारपुसद   विभाग                            ५२,७८०                          ४००  कोटी ४४ लाख ३७ हजारपांढरकवडा  विभाग                     २३,४२२                         १४५ कोटी  २४ लाख ५८ हजार

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र