अमरावती : एका गटाकडून एका युवकाला पाईपने डोक्यावर मारून जखमी केले तर अन्य गटाकडून एका इसमावर लोखंडी कत्त्याने हल्ला चढविल्याची धक्कादायक घटना नागपुरीगेट ठाणे हद्दीतील लालखडी चौक येथे मंगळवारी घडली.
याप्रकरणी फिर्यादी जावेद खाँ शाहीद खाँ (२९, रा. लालखडी) यांच्या तक्रारीवरून आरोपी शेख रुस्तम शेख मजीद , शेख रुस्तमचा मुलगा, कदीर शेख रुस्तमचा साळा (सर्व रा. लालखडी) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. फिर्यादीस आरोपीने शिवीगाळ करून लोखंडी पाईपने मारहाण केली तर एका महिलेच्या तक्रारीवरून आरोपी जावेद खाँ शाहीद खाँ (२९, रा. लालखडी) याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला. जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपीने फिर्यादीच्या पतीस मारहाण करून जखमी केले. पुढील तपास नागपुरीगेट पोलीस करीत आहेत.