लढ्ढा प्लॉट परिरसरात जुगार पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:13 IST2021-02-07T04:13:25+5:302021-02-07T04:13:25+5:30
अमरावती : बडनेरा पोलिसांनी बडनेरा जुनी वस्ती येथील लढ्ढा प्लॉट परिसरात जुगाराच्या साहित्यासह एक मोबाईल असा २०३० रुपयाचा मुद्देमाल ...

लढ्ढा प्लॉट परिरसरात जुगार पकडला
अमरावती : बडनेरा पोलिसांनी बडनेरा जुनी वस्ती येथील लढ्ढा प्लॉट परिसरात जुगाराच्या साहित्यासह एक मोबाईल असा २०३० रुपयाचा मुद्देमाल शुक्रवारी जप्त केला. याप्रकरणी आरोपी किशोरबन जगदाळे (४० रा. लढ्ढा प्लॉट), बंडू सरोदे (४५, रा. बडनेरा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.
-----------------------------------------
चवरेनगरात जुगार पकडला
अमरावती : राजापेठ पोलिसांनी येथील चवरेनगरात धाड टाकून जुगार साहित्यासह ७१५ रुपयांचा मुद्देमाल शुक्रवारी जप्त केला. आरोपी आकाश नारायण खडसे (२८), उमेश सुरेश कलाणे (२७), शंकरराव हातगाडे (२०, तिघे रा. चवरे नगर) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
--------------------------------------
संशयित आरोपी अटकेत
अमरावती : रात्री दरम्यान तोंडाला रुमाल बांधून चोरीच्या उद्देशाने फिरत असलेल्या एका संशयिताला सिटी कोतवाली पोलिसांनी बापट चौकातून शुक्रवारी रात्री ताब्यात घेतले. शेख जावेद ऊर्फ दादु भोबडा शेख साबीर (२८, रा. लालखडी) विरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला..