शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

थेट नियुक्तीने मनमानी कारभाराची भीती

By admin | Updated: May 23, 2016 00:17 IST

पालिकांची निवडणूक दोन प्रभागाचा एक प्रभाग करून तसेच व लोकनियुक्त नगराध्यक्षपध्दतीने घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

अमरावती : पालिकांची निवडणूक दोन प्रभागाचा एक प्रभाग करून तसेच व लोकनियुक्त नगराध्यक्षपध्दतीने घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे आगामी काळात घोडेबाजाराला आळा बसेल. मात्र, लोकनियुक्त नगराध्यक्षांना अर्थसंकल्पाच्या तब्बल १५ टक्के निधी खर्च करण्याची म्हणजे ती कामे मंजूर करण्याचा एकाधिकार असल्याने मनमानी कारभाराची भीती वर्तविली जात आहे. नगरपालिका निवडणुकीत पूर्वी चार वार्डांचा एक प्रभाग अशी रचना होती. यात पक्षाच्या दोन तगड्या उमेदवारांसोबत दोन कच्चे उमेदवारही निवडून आल्याची उदाहरणे आहेत. मात्र, आता प्रभागात दोनच उमेदवार असल्याने राजकीय पक्षांना तोलामोलाचे उमेदवार देण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. पालिकेत एखाद्या राजकीय पक्षाचे बहुमत असताना विरोधीगटाचा लोकनियुक्त नगराध्यक्ष झाल्यास त्याचा कामावर परिणाम होऊ शकतो. अविश्वासाबाबत अस्पष्टता अमरावती : यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पातील २५ टक्के निधी लोकनियुक्त नगराध्यक्ष खर्च करू शकतो, अशी तरतूद आहे. मात्र या तरतुदीमुळे नगराध्यक्षांची एकाधिकारशाही वाढेत. यापूर्वी अडीच वर्षे तर कुठे एक-एक वर्ष विभागून नगराध्यक्षपदाची खिरापत वाटली जात होती. मात्र, आता लोकनियुक्त नगराध्यक्ष असल्याने या फंड्यावरही पाणी फिरले आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष पाच वर्षांसाठी असल्याने एकच व्यक्ती काम सांभाळून शहरातील विकासकामांना न्याय देऊ शकतो. मध्यंतरी लोकनियुक्त नगराध्यक्षांनी राजीनामा दिल्यास या पदासाठी पुन्हा पोटनिवडणूक होऊन लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडला जाईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीतील या निर्णयानंतर आगामी निवडणूक समोर ठेऊन हालचाली गतिमान झाल्या आहेत. युतीच्या काळात सन २००१ मध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष होते. चार वर्षानंतरच्या काळात या नगराध्यक्षाचा बेलगामपणा वाढल्यास अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची संधी होती. मात्र, यंदाच्या शासन निर्णयात तशी तरतूद असेल काय? याबाबत अद्याप सुस्पष्टता नाही. (प्रतिनिधी)