‘एफडीआय’ची कारवाई सुरू
By Admin | Updated: June 21, 2015 00:35 IST2015-06-21T00:35:57+5:302015-06-21T00:35:57+5:30
'उघडयावरील खाद्यान्न अमरावतीकरांच्या मुळावर' या मथळ्याखाली ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रकाशित करताच खाद्यान्न ...

‘एफडीआय’ची कारवाई सुरू
मोहिमेला गती : खाद्यविक्रेत्यांजवळील खाद्यान्न नमुने तपासणार
अमरावती : 'उघडयावरील खाद्यान्न अमरावतीकरांच्या मुळावर' या मथळ्याखाली ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रकाशित करताच खाद्यान्न विक्रेत्यांवर अन्न व औषधी प्रशासन विभाग (एफडीआय) ने लक्ष वेधले. शनिवारपासून उघडयावर खाद्यान्न विक्रेत्यांजवळील अन्नाचे नमुने तपासणी मोहिम सुरु करण्यात आली.
शहरातील हजारो खाद्यान्न विक्रीचे प्रतिष्ठाने असून बहुतांश ठिकाणी उघडयावर खाद्यान्नाची विक्री केली जात आहे. गलिच्छ ठिकाणी व अशुध्द वातावरणात खाद्यान्नांची सर्रास विक्री होत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. विक्रेते खाद्यान्न उघडयावर ठेवत असल्यामुळे त्यावर माश्या व किटक बसून आजाराचा फैलाव करीत आहे.
शहरातील दूषित व प्रदूषित वातावरणामुळे रोगराई वाढली आहे. त्यातच पावसाळ्यात सर्रासपणे उघडयावर खाद्यान्नांची विक्री होत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोकात आले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ ने १९ जून रोजी वृत्त प्रकाशित करताच अन्न व औषधी विभागाचे धाबे दणाणले. सहायक आयुक्त मिलिंद देशपांडे यांनी तत्काळ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना निर्र्देश देऊन उघडयावरील खाद्यान्न विक्रेत्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहे. शनिवारपासून उघडयावरील खाद्यांन्नाची तपासणी मोहिम अन्न व औषधी विभागाकडून सुरु करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
पावसाळ्यात उघड्यावर व्यवसाय करणाऱ्या खाद्यान्न विक्रेत्यांजवळील अन्नपदार्थांंची तपासणी करण्यात येते. तपासणी मोहिम शनिवारपासून सुरु करण्यात आली आहे. विकेत्यांजवळील खाद्यान्न दूषित आढळल्यास तत्काळ कारवाईचे निर्देश अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना देण्यात आले. पावसाळ्यात काळजी घेतली जाईल.
- मिंिलंद देशपांडे,
सहायक आयुक्त (अन्न)