शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सांभाळ करीत नसल्याची तक्रार केल्याने पित्यावर केला बत्त्याने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 13:23 IST

Amravati : भामोद येथे संतापलेल्या मुलाचे कृत्य; येवदा पोलिसांकडून आरोपीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क येवदा/दर्यापूर : वृद्धापकाळात मुलगा सांभाळ करीत नसल्याची तक्रार नातेवाइकांमध्ये करणाऱ्या वयोवृद्ध पित्याला संतापलेल्या मुलाने मध्यरात्री लोखंडी बत्त्याने डोक्यावर अनेक वार करून संपविले. भामोद येथे संपन्न कुटुंबात ही घटना घडली. मंगळवारी पहाटे येवदा पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली.

पोलिस सूत्रांनुसार, रामकृष्ण सदाशिव कात्रे (६०) असे मृताचे, तर अतुल रामकृष्ण कात्रे (४०) मुलाचे नाव आहे. हत्येच्या एक दिवसापूर्वी सोमवारी सकाळी दर्यापूर येथे दोघेही बाप-लेक बँकेत गेले होते. तेथील कामे आटपून दोघेही भामोद येथे सोबतच ते परतले. मध्यरात्रीच्या सुमारास बापलेकातील वादावादीअंती संताप अनावर झालेल्या अतुलने रामकृष्ण यांच्यावर बत्त्याने डोक्यावर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या रामकृष्ण कात्रे यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी घरात आरोपी अतुलची पत्नी व मुलगी असे चौघेच घरी होते. 

मंगळवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास माहिती मिळताच येवदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी रामकृष्ण कात्रे हे घरात खाटेवर रक्ताच्या थारोळ्यात कोसळले होते. अतुल कात्रे हादेखील घटनास्थळी होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवला, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल गायकवाड, ठाणेदार विवेक देशमुख, सहायक उपनिरीक्षक सुधाकर चव्हाण, पोलिस कर्मचारी पंकज नळकांडे, शरद सारसे, अनिल भटकर, प्रवीण वानखडे, अमोल केंद्रे, धनंजय डोंगरे, रोशन टवलारे, मुकेश मालोकार, सुनीता चव्हाण, जयश्री लांजेवार यांनी पंचनामा केला. 

मुलगा सांभाळ करीत नाहीकात्रे कुटुंबात २४ एकर शेती आहे. मृत रामकृष्ण कात्रे यांच्या पश्चात तीन विवाहित मुली व अतुल हा मुलगा आहे. मुलगा आपला व्यवस्थित सांभाळ करीत नसल्याचे नातेवाइकांमध्ये ते वारंवार सांगत होते. त्याचा राग अतुलच्या मनात होता. तो सोमवारी रात्री त्यांच्यात झालेल्या वादादरम्यान उफाळून आला आणि त्याची परिणती रामकृष्ण यांच्या हत्येत झाली. त्याची कबुली अतुलने पोलिसांना जबाबात दिली. त्यावरून त्याला अटक करून भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास येवद्याचे ठाणेदार विवेक देशमुख व कर्मचारी करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती