शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
2
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
3
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
4
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
5
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
6
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
7
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
8
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
9
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
10
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
11
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
12
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
13
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
14
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
15
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
16
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
17
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
18
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
19
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
20
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग

शेतकऱ्यांना दिवसा देता येणार पिकाला पाणी; आठ तास वीज मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 15:50 IST

महावितरणकडून दिलासा: उपकेंद्र येथे पॉवर रोहित्राच्या कामामुळे रात्रीचे ओलित होणार दिवसाच

लोकमत न्यूज नेटवर्कपथ्रोट : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून तयार होत असलेल्या पथ्रोट येथील उपकेंद्रात १० एमव्हीए पॉवर रोहित्राच्या कामास सहायक अभियंता दिगंबर मौदेकर यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला आहे. या उपकेंद्राच्या बांधकामाला पण सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा सलग ८ तास वीजपुरवठा उपलब्ध होणार असून, शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. रात्रीचे ओलीत बंद होऊन हिंस्र प्राण्यांपासून होत असलेला धोका यामुळे टळणार आहे.

पथ्रोट येथील पावर हाऊसअंतर्गत परसापूर, भिलोना, शिंदी या उच्चदाब वाहिनीसाठी दिवसा वीजपुरवठा देणे सोयीचे ठरणार आहे. महावितरणचे सध्याच्या वेळापत्रक नियमानुसार सप्ताहातील काही दिवस दिवसा व रात्री असे भारनियमन असायचे. पण शेतशिवारात शेतकरी तथा शेतमजुरांना रात्रीला पाणी देण्यासाठी जावे लागे. अशावेळी डुक्कर, साप, विंचू, बिबट्या अशा हिंसक प्राण्यांपासून धोका निर्माण होत होता. शेतकऱ्यांवर हल्ला होऊन जखमी होण्याचे प्रमाण व घटना घडताना दिसून येत असायच्या. पण आता महावितरणने नवीन पॉवर रोहित्राचे काम सुरू केल्यामुळे रात्रीचा वीजपुरवठा बंद करणार व दिवसाला आठ तास वीजपुरवठा करून शेतकऱ्यांना सोयीचा जाईल अशी व्यवस्था महावितरण करणार आहे.

शेतकऱ्यांमध्ये समाधान

महावितरणच्या या सुविधेमुळे शेतात रात्रीचे ओलीत पूर्णतः बंद होणार व दिवसा वीजपुरवठा मिळून ओलीत करणे सोयीचे जाणार आहे. रात्रीला शेतात मिळणारा सिंगल फेज वीजपुरवठा कायमस्वरूपी सुरूच राहणार, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

"वीजेअभावी रात्रीला शेती पिकांना पाणी देण्याचे काम करण्यास मजूर नकार देतात. यातच वीजेअभावी रात्रीच्या ओलिताचे नियोजन बदलते. या निर्णयामुळे दिवसा शेती पिकांना पाणी देणे सोईचे होईल. व रात्रीची डोकेदुखी थांबेल."- अशोक अरबट, शेतकरी 

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers to Get Daytime Water Supply: Eight Hours of Electricity

Web Summary : Farmers in Pathrot will receive eight hours of daytime electricity for irrigation due to a new power sub-center. This eliminates the need for nighttime watering and the dangers posed by wild animals, bringing relief to the farming community.
टॅग्स :electricityवीजFarmerशेतकरीWaterपाणीCropपीकfarmingशेतीAmravatiअमरावती