शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

शेतकऱ्याचा मृत्यू; जिल्हा प्रशासनाविरुद्ध रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:39 AM

जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर विष प्राशन करणारे शेतकरी अनिल चौधरी यांचा शुक्रवारी सकाळी ९ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनिल चौधरी यांची रास्त मागणी पूर्ण करा, अन्यथा त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन होऊ देणार नाही, असा पवित्रा नातेवाईक व गावकºयांनी घेतल्याने खळबळ उडाली होती.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी दालनासमोरील आत्महत्येचे प्रकरण : आश्वासनानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर विष प्राशन करणारे शेतकरी अनिल चौधरी यांचा शुक्रवारी सकाळी ९ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनिल चौधरी यांची रास्त मागणी पूर्ण करा, अन्यथा त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन होऊ देणार नाही, असा पवित्रा नातेवाईक व गावकऱ्यांनी घेतल्याने खळबळ उडाली होती. मात्र, शेतकरी आत्महत्येसंदर्भात शासकीय मदत मिळवून देण्याचा प्रस्ताव पाठविला जाईल, अशा जिल्हा प्रशासनाच्या आश्वासनंतर नातेवाईक व गावकºयांनी शवविच्छेदनास सहमती दर्शविली.समृद्धी महामार्गासाठी शेतातच होत असल्याने शेताचे मोजमाप झाल्याशिवाय खोदकाम करू नका, या रास्त मागणीचे निवेदन नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहगाव येथील रहिवासी अनिल महादेव चौधरी (४५) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पूर्वीच सादर केले होते. तरीही गुरुवारी तलावातील खोदकाम सुरू करण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या अनिल चौधरी यांनी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. त्यावेळी त्यांच्या मागणीचे समाधान झाले नाही. त्यामुळे अनिल चौधरी यांनी जिल्हाधिकारी दालनासमोरच विष प्राशन केले. गाडगेनगर पोलिसांनी त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. अतिदक्षता कक्षात हलविण्यात आले. उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. घटनेच्या माहितीवरून नातेवाइकांसह गावकऱ्यांनी इर्विन रुग्णालयात धाव घेतली. सर्वांच्या संतप्त भावना होत्या. अनिल चौधरी यांच्या रास्त मागण्या मान्य करा, अन्यथा त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करू देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतल्याने खळबळ उडाली. हा मुद्दा रेटून धरल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी इर्विन रुग्णालयात येऊन चर्चा केली. तासभराच्या चर्चेनंतर प्रशासनाकडून सकारात्मक प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर नातेवाईक व गावकऱ्यांनी अनिल चौधरी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास सहमती दर्शविली.समृद्धी महामार्गासाठी मनमानी पद्धतीने अवैध उत्खनन सुरू आहे. त्यांनी दलाल पेरले. अधिकारी सहभागी झाले आहेत. चौधरींच्या तक्रारीची दखल यापूर्वीच घेतली असती, तर त्यांचे प्राण वाचले असते. हा ‘समृद्धी’चाच बळी आहे.- वीरेंद्र जगतापआमदार, चांदूर रेल्वेशेतकरी कुटुंबाला मदत मिळवून देण्यासाठी प्रस्ताव तयार केला जाईल. शेतकरी आत्महत्येसंदर्भात मिळणाºया मदतीसाठी प्रस्ताव पाठविला जाईल. याबाबत सकारात्मक प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन नातेवाइकांना दिले आहे.- विवेक घोडके उपजिल्हाधिकारीगावकऱ्यांचा आधारवड गेलाअत्यंत मनमिळावू स्वभावाचे अनिल चौधरी हे सर्वांसाठी कोणत्याही वेळी धावून जायचे. तालुक्यात कुठेही काही घडल्यास ते सांत्वन देण्यासाठी पोहोचायचे. स्वत:च्या कुटुंबाचा विचार न करता, दुसऱ्यांच्या मदतीसाठी धडपडत असत. गावात येणारा कोणतेही राजकीय किंवा शासकीय पदाधिकारी त्यांच्याशी चर्चा करायचे. त्यांच्या रूपाने कुटुंबीयांसह गावकऱ्यांचा आधारवड गेल्याची खंत नातेवाईक व गावकऱ्यांनी व्यक्त केली. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी रात्री लोहगाव (ता. नांदगाव खंडेश्वर) येथे अंत्यसंस्कार पार पडले. याप्रसंगी मावसभाऊ देवानंद चौधरी, पुतण्या चेतन चौधरी, प्रकाश चौधरी यांच्यासह मित्रपरिवारातील अवि भगत, गजान ठाकरे, डॉ. मनोहरे, छोटू मुंदे, सचिन रिठे यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या पश्चात पत्नी भारती, मुलगा गौरव, मुली वेदिका व सानिका आहेत.आत्महत्येपूर्वी मित्राशी फोनवर संवादअनिल चौधरी यांचा सर्वात जवळचे मित्र अरविंद भगत यांना मोबाइलवर गुरुवारी दुपारी २ वाजता कॉल आला. शेत धरणात गेले, मी समृद्धीला विकले नाही. माझी परवानगी न घेता शेतात खोदकाम सुरु होते. त्यामुळे मी रोखण्यासाठी गेलो. पोलीस आले, त्यांनी हाकलून दिले. कलेक्टर आॅफीसला गेलो. ते लंचसाठी गेले. त्यानंतर मला उडवाउडवीची उत्तरे मिळाली, असे संभाषण अनिल यांनी केले. मानवधर्म निभविणारा मित्र आमच्यातून निघून गेला. त्याच्या बलिदानाचे सार्थक व्हायला हवे, अशी गावकºयांची मागणी आहे.जिल्हा परिषदेच्या ठरावाचा बळीजिल्हा परिषदेच्या व्यवस्थापन समितीने १५ मे रोजी ठराव घेतला. गावतलावाचा गाळ काढण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले. यासाठी त्यांनी गावतलावालगतच्या सर्व शेतकऱ्यांची परवानगी घ्यायला हवी होती, मात्र, कोणालाही न विचारता आचारसंहितेत हा ठराव घेण्यात आला. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ठरावाचा अनिल चौधरी हा बळी गेला आहे, असा आरोप जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते रवींद्र मुंदे यांनी केला.चुलतभावाची मध्यस्थीअनिल चौधरी यांचे चुलतभाऊ पुरुषोत्तम चौधरी यांनी जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून आलेले विवेक घोडके यांच्याशी चर्चा केली. शासनाकडून शेतकरी आत्महत्येविषयी दिल्या जाणाऱ्या मदतीसाठी प्रयत्न केले जाईल, असे आश्वासन घोडके यांनी पुरुषोत्तम चौधरी यांना दिले.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यू