सतच्या नापिकीमुळे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 18:43 IST2019-11-11T18:41:35+5:302019-11-11T18:43:35+5:30
नापिकी आणि कर्जाला कंटाळून शेतकऱ्यानं संपवलं जीवन

सतच्या नापिकीमुळे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
शेंदूरजनाघाट (अमरावती) : येथील अल्पभूधारक शेतकरी दिलीप किसनराव आंडे (४९) यांनी त्यांच्या मोहाडी शिवारातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार ११ नोव्हेंबर रोजी सकाळी उघड झाला. दिलीप आंडे हे १० नोव्हेंबरच्या दुपारपासून घराकडे फिरकले नव्हते. त्यांची शोधाशोध करण्यात आली. सकाळी ते स्वत:च्या शेतात गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आले. सततच्या नापिकीमुळे ते विवंचनेत होते. त्यांच्यावर सोसायटी, बँक व इतर उसनवार असे कर्ज असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. आंडे यांच्या पश्चात पत्नी करुणा, दोन मुली तृप्ती व अश्विनी असा परिवार आहे. वरूड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवला आहे.