होम क्वारंटाईन २५२ रुग्णांवर फॅमिली डॉक्टरांचा वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:29 IST2020-12-15T04:29:54+5:302020-12-15T04:29:54+5:30
फोनद्वारे रोज दोनदा संवाद, डिस्चार्जपश्चातही पाठपुरावा अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्ग जुलैअखेर वाढू लागताच ज्या रुग्णांकडे स्वतंत्र खोलीसह प्रसाधनगृहाची ...

होम क्वारंटाईन २५२ रुग्णांवर फॅमिली डॉक्टरांचा वॉच
फोनद्वारे रोज दोनदा संवाद, डिस्चार्जपश्चातही पाठपुरावा
अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्ग जुलैअखेर वाढू लागताच ज्या रुग्णांकडे स्वतंत्र खोलीसह प्रसाधनगृहाची व्यवस्था आहे, अशा रुग्णांना गृह विलगीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. सद्यस्थिीत जिल्ह्यात होम आयसोलेशनमध्ये ॲक्टिव्ह २५२ रुग्ण आाहेत. त्या रुग्णांवर कंट्रोल रूममधून रोज दोनदा फोनद्वारे संवाद साधून प्रकृतीबाबत विचारणा केली आहे. याशिवाय फॅमिली डॉक्टरांचा रोज वॉच आहे.
ज्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, त्या रुग्णांना पोस्ट कोविड पाठपुरावा केला जात आहे. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रथम त्या रुग्णाची येथील कोविड रुग्णालयात आरोग्य तपासणी केली जाते व रुग्ण जर लक्षणेविरहित, सौम्य लक्षणाचा असेल, तर त्याला कोरोना केअर हॉस्पिटलमध्ये पाठविले जाते. याव्यतिरिक्त ज्या रुग्णाकडे गृहविलगीकरणात स्वतंत्र १७ दिवस राहण्याची व्यवस्था आहे, याविषयी उपचार करण्यासाठी त्यांच्याशी संबंधित अनुमती व स्थानिक स्वराज्य संस्थेचा दाखला असल्यास, त्यांना होम आयसोलेशनची परवानगी दिल्या जाते व त्यांच्या घरासमोर बोर्डदेखील लावला जातो. हा रुग्ण बाहेर आढळल्यास त्यांना सक्तीने भरती केले जाऊ शकते.
सद्यस्थितीत महापालिका क्षेत्रात ॲक्टिव्ह ८१ व आतापर्यंत दाखल २,४४१ तसेच ग्रामीण क्षेत्रात १७१ व आतापर्यंत दाखल १४४६ असे एकूण ॲक्टिव्ह २५२ व आतापर्यंत दाखल ३,८८७ रुग्णांनी या सुविधेचा फायदा घेतलेला आहे.
बॉक्स
जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या : १८५९५
सध्या उपचार सुरू : १९६
होम क्वारंटाईन रुग्ण : २५२
बॉक्स
होम क्वारंटाईन रुग्णांनी ही घ्यावी काळजी
* नियंत्रण कक्षातून दोन वेळा फोन, याशिवाय आशा वर्करद्वारे रुग्णांच्या घराला भेटी देण्यात येतात. याव्यतिरिक्त रुग्णांनीदेखील काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कोरोनाचा संसर्गाचा अधिशयन ( इनक्युबेशन) कालावधी १४ दिवसांपर्यंत असतो. अतिदक्षतेकरिता हा कालावधी किमान १७ दिवसांपर्यंत पाळणे महत्त्वाचे आहे. रुग्णाच्या संपर्कात आल्याच्या शेवटच्या दिवसापासून हा १७ दिवसांचा कालावधी गृहीत धरण्यात येतो.
*या कालावधीत रुग्णांनी दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये व बाहेरील व्यक्तीला घरात येऊ देऊ नये. विलगीकरणात अंगावरील कपडे, वापरलेला हातरूमाल, नॅपकीन कोरडेच असताना दुसऱ्या कुणाच्याही संपर्कात येणार नाही, याची काळजी घ्यावी. फिजिकल डिस्टन्सचे पालन व मास्कचा वापर अनिवार्य आहे. नेहमी सॅनिटायझरने हात धुवावे, खोकताना किंवा शिंकताना नाकावर किंवा तोंडावर रुमाल पकडावा.
कोट
महापालिकेने यासंदर्भात एक संकेतस्थळ सुरू केले आहे. ९० रुग्णांनी ऑनलाईन नोंदणी करून या सुविधेचा लाभ घेतला. या रुग्णांशी नियमित संवाद होतो तसेच त्यांना संदेशाद्वारे आरोग्यविषयक माहिती देण्यात येते.
- सचिन बोंद्रे, नोडल अधिकारी, होम आयसोलेशन