शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

विदर्भाच्या नंदनवनात शेकडो फूट उंचावरून कोसळू लागले धबधबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 22:30 IST

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर काही दिवस मुसळधार पाऊस कोसळल्याने नदी नाले खळखळू लागले आहे. गगनभेदी उंच पहाडावरून शेकडो फूट खाली कोसळणाऱ्या धबधब्यांचा आनंद पर्यटक घेत असल्याने आल्हाददायक वातावरण परमोच्च बिंदूवर आल्याचा नजारा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला आहे.

ठळक मुद्देपाऊस हजारी गाठणार : मेळघाटचा दिलखेच नजारा खुणावतोय
<p>लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर काही दिवस मुसळधार पाऊस कोसळल्याने नदी नाले खळखळू लागले आहे. गगनभेदी उंच पहाडावरून शेकडो फूट खाली कोसळणाऱ्या धबधब्यांचा आनंद पर्यटक घेत असल्याने आल्हाददायक वातावरण परमोच्च बिंदूवर आल्याचा नजारा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला आहे.चिखलदरा पर्यटन स्थळावर एकंदर ४० पॉइंट असून, पर्यटकांना आकर्षित करणारा असा नजारा आहे दाट धुके तर कधी मुसळधार कोसळणा?्या पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद घेत आहेत हिरव्याकच्च पहाडावरून शेकडो फूट खाली कोसळणारे धबधबे चिखलदरा सह परिसरातील दृश्य पर्यटकांना मोहात पाडणारे ठरले आहे शनिवार रविवार या सुटीच्या दिवशी हजारो पर्यटक भेट देत आहेत येथील भीमकुंड पॉइंट्स देवी पॉइंट, जत्राडोह, सेमाडोह येथील जवाहर कुंड, पंचबोल पॉईंट यासह मेळघाटच्या नागमोडी घाट वळणावर ठिकठिकाणी उंचावरून कोसळणारे धबधबे पर्यटनाच्या नजारा चार चांद लावणारे ठरले आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वसलेल्या सेमाडोह येथील नजरा पर्यटकांची पहिली पसंत ठरू लागला आहे. देवी पॉइंटवरून उगमस्थान असलेली चंद्रभागा, सिपना नद्या खळखळून वाहू लागले लागल्या आहेत.दमदार पावसाने पर्यटनाला बहारमागील काही वर्षांत पर्यटन स्थळासह मेळघाटात पावसाने दांडी मारल्याने बोडके जंगल वृक्ष रानवेली आटलेले धबधबे कोरडे नदी-नाल्यांचे दर्शन पर्यटकांना घडले. मात्र पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे पर्यटनात प्राण फुंकले आहे. तब्बल २५ दिवस पावसाने येथे दररोज हजेरी लावलीशासन स्तरावर उपेक्षितचचिखलदरा पर्यटनस्थळ समुद्रसपाटीपासून तीन हजार सहाशे फूट उंचावर असून इंग्रज राजवटीत कॅप्टन रॉबिन्सन यांनी याचा शोध लावला होता. हवापालट आणि आरामासाठी इंग्रज येथे येत असत. विदर्भात एकमेव या पर्यटन स्थळावर विकासाच्या गप्पा झाल्या. मात्र प्रत्येक शासनाने उपेक्षाच केली.