शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
2
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
3
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
6
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
7
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
8
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
9
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
10
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
11
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
12
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
14
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
20
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात बिबट्यांसाठी अतिरिक्त ‘ट्रॅप कॅमेरे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:00 IST

बिबट्यांमुळे विद्यापीठात मोकाट कुत्र्यांची संख्या बरीच कमी झाली, हे नक्की. विद्यापीठाच्या मागील भागातील जंगलातून ये-जा करणाऱ्या बिबट्यांच्या जोडप्यांनी काही भाग संचारासाठी निश्चित केले आहे. घनटाद वृक्ष, झाडा-झुडपात ते दडून बसल्याचे सुरक्षा रक्षकांनी अनेकदा बघितले आहे.

ठळक मुद्देवनविभागाचा प्रस्ताव : सुरक्षित जेरबंद करण्यासाठी वरिष्ठांकडे पत्रव्यवहार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिसरात गत दोन वर्षांपासून बिबट्याच्या जोडप्यासह दोन पिलं वावरत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिरिक्त ‘ट्रॅप कॅमेरे’ बसविण्याच्या निर्णय वनविभागाने घेतला आहे. तसा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविल्याची माहिती आहे.विद्यापीठात सावज शोधण्यासाठी बिबट येत असल्याने अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. बिबट्यांमुळे विद्यापीठात मोकाट कुत्र्यांची संख्या बरीच कमी झाली, हे नक्की. विद्यापीठाच्या मागील भागातील जंगलातून ये-जा करणाऱ्या बिबट्यांच्या जोडप्यांनी काही भाग संचारासाठी निश्चित केले आहे. घनटाद वृक्ष, झाडा-झुडपात ते दडून बसल्याचे सुरक्षा रक्षकांनी अनेकदा बघितले आहे. आतापर्यंत बिबट्याने कुत्र्यांची शिकार केल्याचे वास्तव आहे. मात्र, अलीकडे बिबट्याने विद्यापीठात गर्दी असलेल्या भागाकडे आगेकूच केली आहे. पंधरवड्यापूर्वी कॅन्टीन असलेल्या भागापर्यंत बिबट्याने अस्तित्व निर्माण केले आहे. त्यामुळे बिबट सावज शोधण्यासाठी विद्यापीठाच्या कोणत्याही भागात संचार करू शकतो, अशी भीती अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये दाटली आहे.दोन दिवसांपूर्वी वनविभागाच्या भरारी पथकाने विद्यापीठाचा परिसर पिंजून काढला. बिबट्याच्या संचार मार्गाचे परीक्षण केले. जंगलातून बिबट्याचे विद्यापीठात येण्याचे काही मार्ग वनविभागाच्या या चमूला आढळले. त्यामुळे बिबट्याच्या या संचार मार्गावर अतिरिक्त ‘ट्रॅप कॅमेरे’ बसविले जाणार आहेत. त्यानुसार वडाळी वनपरिक्षेत्र कार्यालयामार्फत वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे. एकंदर १० ते १२ कॅमेरे बसविले जातील. त्याकरिता निधी उपलब्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविला जाणार आहे.विद्यापीठात यापूर्वी बिबट्याच्या मुख्य मार्गावर ‘ट्रॅप कॅमेरे’ बसविण्यात आले होते. आता पुन्हा विद्यापीठ प्रशासनाकडून सुरक्षिततेची मागणी आली आहे. त्यामुळे अतिरिक्त कॅमेरे बसवून बिबट्यावर मॉनिटरिंग केले जाईल.- कैलास भुंबरआरएफओ, वडाळी.

टॅग्स :leopardबिबट्या