शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

‘जिगाव’ प्रकल्पातून दोन वर्षांत साडेसात हजार हेक्टर सिंचन निर्मिती अपेक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 16:50 IST

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील ‘जिगाव’ हा मोठा प्रकल्प असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पहिल्या दोन वर्षांत या प्रकल्पातून साडेसात हजार हेक्टर सिंचन निर्मिती अपेक्षित आहे.

- संदीप मानकर

अमरावती : बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील ‘जिगाव’ हा मोठा प्रकल्प असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पहिल्या दोन वर्षांत या प्रकल्पातून साडेसात हजार हेक्टर सिंचन निर्मिती अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने जलसंपदा विभागाने नियोजन केले आहे. २०१९-२० मध्ये २५०० हेक्टर, तर २०२० -२१  मध्ये पाच हजार हेक्टर सिंचनाचे नियोजन या प्रकल्पातून करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य अभियंत्यांनी दिली. अनुशेषांतर्गत सदर प्रकल्प असून, हा प्रकल्प सद्यस्थितीत एसआयटी चौकशीच्या विळख्यात अडकला आहे. या प्रकल्पाची ७३६.५८ दलघमी पाणीसाठवन क्षमता राहणार आहे. १ लाख १ हजार ८८ हेक्टर एवढे सिंचनाचे नियोजन घडभरणीनंतर पहिल्या वर्षी ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. ‘जिगाव’ प्रकल्पाची अद्ययावत किंमत  १३ हजार ७४५.१८ कोटी आहे. ३१ मार्च २०१८ अखेर या प्रकल्पावर ३०७७.१२ कोटींचा खर्च झाला आहे. यातील काही निविदा ह्या वादग्रस्त ठरल्या असून त्याची शासनाने चौकशीचे आदेश दिले होते. यामध्ये दोषी आढळलेल्या तत्कालीन अधिकारी व कंत्राटदारविरोधात एसआयटीने चौकशीअंती गुन्हा नोंदविला होता. या प्रकल्पाची उर्वरित किंमत १०६६८.०६ कोटी आहे. यामध्ये सन २०१८-१९ मध्ये शासनाने ३४३.३४ कोटींची तरतूद केली आहे. प्रकल्पसाठी सन २०१९-२० मध्ये २४८९.०६ कोटी, २०२०-२१ मध्ये २७०६.१७ कोटी, २०२१-२२ मध्ये १७४६.१० कोटी, तर सन २०२२-२३ मध्ये २४३६.७६ कोटींचा निधी लागणार आहे. त्याच कारणाने हा प्रकल्प बळीराजा जलसंजीवनी योजनेत समाविष्ट करण्यात आला आहे.  १४,९१२.३२ हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता जिगाव प्रकल्पासाठी एकूण १४ हजार ९१२.३२ हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता आहे. यामध्ये सरळ खरेदीने ५६९.१० हेक्टर, तर प्रक्रियेव्दारे १५७३.०१ हेक्टर करण्यात आली आहे. एकूण २१४२.११ हेक्टर भूसंपादन करण्यात आले असून, १२,७७०.२१ हेक्टर भूसंपादन बाकी आहे. याकरिता प्रस्ताव सादर करण्यात आला असून, ते प्रक्रियेत आहे. १२४४.४७ हेक्टरचा भूसंपादनासाठी अद्यापही प्रस्तावच सादर केलेला नाही. 

३२ गावठाणे पूर्णत: बाधित या प्रकल्पासाठी ३२ गावठाणे पूर्णता: बाधित असून, सात गावांची जमीन संपादित करण्यात आली आहे. उर्वरित भूसंपादन प्रगतीपथावर असल्याची माहिती मुख्य अभियंत्यांनी दिली. नवीन गावठाणाच्या नागरी सुविधेसाठी ३ गावे पूर्ण व दोन गावांच्या नागरी सुविधा प्रगतीपथावर आहेत.

टॅग्स :Amravatiअमरावती