शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा, महाविद्यालयीन प्रवेश शुल्कात वाढ नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 06:00 IST

विद्यापीठाने विविध परीक्षा शुल्क आणि महाविद्यालयांत प्रवेश शुल्कात वाढ प्रस्तावित केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला. अमरावती विद्यापीठ क्षेत्रात ग्रामीण, शेतकरी कुटुंबातील मुलांचे महाविद्यालयात प्रवेश आहेत. त्यामुळे अमरावती विद्यापीठाने पुणे, मुंबईच्या तुलनेने परीक्षा आणि महाविद्यालयात प्रवेशात वाढ करणे योग्य नाही, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते.

ठळक मुद्देविद्यापीठावर संभाजी ब्रिगेडची धडक : कुलसचिवांना निवेदन; नारेबाजीत शुल्कवाढीला नकार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नत महाविद्यालयांत प्रवेश आणि परीक्षा शुल्कात वाढ नको, अशी मागणी निवेदन बुधवारी संभाजी ब्रिगेड व वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेने केली. विद्यापीठात परीक्षा शुल्कवाढीविरुद्ध जोरदार नारेबाजी करण्यात आली. कुलसचिव तुषार देशमुख यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले.विद्यापीठाने विविध परीक्षा शुल्क आणि महाविद्यालयांत प्रवेश शुल्कात वाढ प्रस्तावित केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला. अमरावती विद्यापीठ क्षेत्रात ग्रामीण, शेतकरी कुटुंबातील मुलांचे महाविद्यालयात प्रवेश आहेत. त्यामुळे अमरावती विद्यापीठाने पुणे, मुंबईच्या तुलनेने परीक्षा आणि महाविद्यालयात प्रवेशात वाढ करणे योग्य नाही, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते.सेमिस्टर पॅटर्न परीक्षेमुळे गरीब, सामान्य कुटुंबांंतील विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. बॅकलॉग परीक्षेचे अर्ज भरताना ६०० रुपये शुल्क मोजावे लागतात, असे निवेदनात स्पष्ट केले आहे. संत गाडगेबाबा विद्यापीठाने शैक्षणिक धोरणात खासगी महाविद्यालयांना प्रवेश शुल्कात वाढ करण्याची मुभा दिली असल्याचे संकेत आहेत. ही बाब सत्य ठरल्यास संभाजी ब्रिगेड विद्यापीठातच प्रवेशास अधिकाऱ्यांना मनाई करेल, असा इशारा देण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हितास्तव परीक्षा आणि महाविद्यालयीन प्रवेशात वाढ करू नये, या मागणीचा पुनरुच्चार संभाजी ब्रिगेडच्यावतीने करण्यात आली. यावेळी सहायक कुलसचिव व इतर अधिकारी उपस्थित होते. निवेदन देताना करण तायडे, अजित काळबांडे, सुयोग वाघमारे, प्रतीक कडू, कृणाल गावंडे, निखिल काळे, नीलेश सोनटक्के, हर्षल जाधव, अक्षय खडसे, शुभम भांबूरकर, सौरभ वऱ्हेकर आदी उपस्थित होते.गत पाच वर्षांपासून परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली नाही. मात्र, यापूर्वी विद्यार्थी संघटनांच्या मागणीनुसार परीक्षा शुल्क कमी करण्याबाबत समितीचे गठण करण्यात आले. समितीचा जो अहवाल येईल, तोच निर्णय प्रशासन घेणार आहे. महाविद्यालयात प्रवेश शुल्क निश्चितीबाबत समिती शुल्क ठरविते.- तुषार देशमुखकुलसचिव, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

टॅग्स :sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडexamपरीक्षा