शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

दरवर्षी येलकीच्या शिवमंदिराला पडतो पुराचा वेढा

By admin | Updated: May 24, 2016 00:40 IST

अचलपूर तालुक्यातील येलकी पूर्णा येथील शिवसंस्थान व शंकर प्रतिष्ठानला पुराचा अक्षरश: वेढा पडतो. हे मंदिर पाण्याखाली जाते.

जलसंधारण मंडळाचे दुर्लक्ष : बंधारा वाहून गेला, संरक्षण भिंत बांधणार केव्हा ?अमरावती : अचलपूर तालुक्यातील येलकी पूर्णा येथील शिवसंस्थान व शंकर प्रतिष्ठानला पुराचा अक्षरश: वेढा पडतो. हे मंदिर पाण्याखाली जाते. पूर्णा नदीला जुलै २०१४ साली आलेल्या पुरामुळे नदीकाठचा पूलवजा बंधारा वाहून गेल्याने या मंदिराला संरक्षण भिंत बांधण्याची अत्यंत गरज आहे. परंत लघुसिंचन जलसंधारण मंडळाचे दुर्लक्ष असल्याने पावसाळ्यात या देवस्थानात येणाऱ्या भाविकांना एक तर दर्शन टाळावे लागते किंवा पोहून त्याठिकाणी जावे लागते. पूर्णा नदीला सन २०१४ साली मोठा पूर आला होता. येलकी पूर्णा हे गाव खारपाणपट्ट्यात येते. या भागातील नदीचे काठ मऊ स्तरातील असल्याने येथील बंधारा विंग वॉलसह क्षतिग्रस्त झाला होता. लघुसिंचन जलसंधारण मंडळाने देखील ही बाब मान्य केली आहे. वास्तविक ही संरक्षण भिंत व पूलवजा बंधारा चुकीच्या ठिकाणी बांधण्यात आला होता. परंतु अद्यापही हे काम झालेले नाही. त्यामुळे येथे येणाऱ्या भक्तांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. चुकीच्या ठिकाणी बंधारा व संरक्षण भिंतीचे बांधकाम केल्याने पुलवजा बंधारा तुटल्याचा आरोप येलकी पूर्णा येथील शिवसंस्थान व शंकर प्रतिष्ठानचे सचिव कैलास राऊत यांनी केला आहे. क्षतिग्रस्त बंधाऱ्याचा उर्वरित भाग नदीपात्रात तसाच शिल्लक आहे. त्यामुळे नदीपात्रातील पुराच्या पाण्याला अडथळा निर्माण होऊन पुराचा फुगवटा निर्माण होत असल्याने उजव्या बाजूकडील नदीच्या कडा विस्कळीत होऊन तेथे मोठा खड्डा पडेलला आहे. त्यामुळे मंदिराला व गावाकडच्या भागाला पुराचा धोका संभवतोे. यामुळे मनुष्यहानी तसेच आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. याबाबत सन २०१४ पासून निवेदन अर्ज देखील संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेत. यासर्व प्रकरणात संबंधित अधिकारी टोेलवाटोलवीची उत्तरे देत असून चुकीचा अहवाल वरिष्ठांना सादर करीत असल्याचा आरोेपही कैलास राऊत यांनी केला आहे.