शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

जरी का इमामवाड्यात भजनाची परंपरा कायम

By admin | Updated: August 7, 2015 00:30 IST

येथील ‘जरी का इमामवाड्यात’ गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पूजाअर्चा व भजन केले जाते. ही परंपरा तीनशे वर्षांपासून सुरू आहे.

हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक : यावर्षी पोलीस बंदोबस्त नाहीसुनील देशपांडे  अचलपूरयेथील ‘जरी का इमामवाड्यात’ गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पूजाअर्चा व भजन केले जाते. ही परंपरा तीनशे वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे हा धार्मिक कार्यक्रम म्हणजे हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक ठरत आहे.गुरु परंपरेनुसार अचलपूर येथील हिरापुरा भागातील हिंदूधर्मीय भजनी मंडळीने तपकिरी रंगाच्या भल्या मोठ्या काठीला लावलेल्या झेंड्याची मिरवणूक हिरापुरा देवडी, बुद्धेखां चौक ते इमामवाड्यापर्यंत भजनाच्या तालावर काढली. इमामवाड्यात गेल्यावर तेथे असलेल्या बेगाबाई, बादशहा यासह पाच समाध्यांची (कबरीचे) हिंदू धर्माच्या प्रथेनुसार पूजाअर्चा करून आरती म्हटली जाते. या अगोदर समाधीस्थळी भजने म्हटली जातात. या कार्यक्रमात २०० पेक्षा अधिक लोक सहभागी होतात. दरवर्षी या मिरवणुकीत पोलीस बंदोबस्त असतो. परंतु यंदा अचलपूर पोलीस ठाण्याला कार्यक्रमाची माहिती दिल्यावरही पोलीस बंदोबस्त देण्यात आला नव्हता. आख्यायिका सांगताना हिरापुरा भागातील रहिवासी प्रल्हादराव अग्राये, सुरेश आकोलकर म्हणाले की, सुमारे ३०० वर्षांपूर्वी सापन नदीच्या तिरावर गांधी पुलाच्या बाजूला असलेल्या ‘जरी का इमामवाड्या’त एक मुस्लिम बादशाहा राहत होता. त्याकाळी सापन नदीला महापूर येत असे. नदीच्या पलीकडे तापी महाराजांचा मठ आहे. त्या मठात साधूसंत निवास करीत असत. त्याच मठात बेगाबाई नामक तपस्वीनी रहात होती. तिला एक मुलगा होता. ती अप्रतिम सुंदर होती. तिने कठोर तपश्चर्येने आध्यात्मिक शक्ती आत्मसात केली होती. बेगाबाई सापन नदीच्या काठावर फिरायला येत असे. ती नेहमी देवाच्या नामस्मरणात मग्न राहत असे एकदा ती फिरत फिरत हिरापुऱ्यात आली तेथे भजन सुरू होते ते भजन तिने ऐकले व मठात निघून गेली. काही दिवसानंतर बेगाबाई नदीच्या पलीकडे गेली तेव्हा नदीला पाणी नव्हते. परंतु जेव्हा ती परत जायला निघाली तेव्हा नदीला मोठा पूर आलेला होता. म्हणून बेगाबाई किनाऱ्यावरील ‘जरी का इमामवाडा’ येथे थांबली. नदीचा पूर उतरत नसल्याने तिला मुक्काम येथेच करावा लागला. तेव्हा बादशहाची वाईट नजर तिच्यावर पडली. बादशहाने तिला जेवणासाठी ताटात कापडाने झाकून गाईच्या मांसाचे तुकडे आणले तिने जेव्हा कापड काढले तेव्हा त्या मासाची कमळाची फुले झाली. ते पाहून बादशहाला आश्चर्य वाटले. त्याने बेगाबाईला आपलेसे करण्याकरीता वाईट कृत्य करण्यास सुरूवात केली असता बेगाबाईने परमेश्वराचा धावा केला. लगेच ती हळूहळू धरणी मातेच्या उदरात समाविष्ट होत गेली. त्यावेळी बादशहाने तिचे केस हातात घट्ट पकडले. बादशहाच्या हातात तिचे केस आले. तिने शेवटच्या क्षणी बादशहाला सांगितले की, हे माझे केस हिरापुरा येथील दिंडी-भजन वाल्यांना नेऊन दे आणि त्यांना सांग की वर्षातून एकदा गुरूपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी माझ्या समाधीवर भजन करत जा. बादशहाला पश्चाताप झाला.