शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

आंबे पिकविण्यासाठी इथिलिन स्प्रे, चायनिज पावडरचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:52 IST

आंबे पिकल्याचे चिन्ह म्हणजे त्यांचा पिवळेपणा. या रंगाला ग्राहक मोहून जातात. मात्र, त्यासाठी फळांच्या राजावर चक्क इथिलिन स्प्रे, पावडर तसेच कॅल्शियम कार्बाइड आदी घातक रसायनांचा प्रमाणाबाहेर वापर होत असल्याचे अमरावती येथील फळबाजारातील चित्र आहे.

ठळक मुद्दे आरोग्याला घातक : फळांचा राजा घेऊन आला आजार मोफत; प्रमाणापेक्षा जास्त वापर धोकादायक

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आंबे पिकल्याचे चिन्ह म्हणजे त्यांचा पिवळेपणा. या रंगाला ग्राहक मोहून जातात. मात्र, त्यासाठी फळांच्या राजावर चक्क इथिलिन स्प्रे, पावडर तसेच कॅल्शियम कार्बाइड आदी घातक रसायनांचा प्रमाणाबाहेर वापर होत असल्याचे अमरावती येथील फळबाजारातील चित्र आहे. त्यामुळे आंब्यासोबत प्रत्येकाच्या घरात आजार मोफत जात असल्याने आरोग्य सांभाळणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.कृषिउत्पन्न बाजार समितीच्या फळ व भाजीबाजारात विविध राज्यांतून दररोज शेकडो क्विंटल आंबे येतात. याच ठिकाणी सकाळी त्यांचा लिलाव होतो. ठोक व्यापाऱ्यांकडून किरकोळ व्यावसायिक सदर आंब्याची खरेदी करतात. या साखळीत आंबे पिकविण्यासाठी इथेलिन स्प्रेचा प्रमाणापेक्षा जास्त वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. आंबे पिकविण्यासाठी इथेलिन स्प्रे वैध असल्याचे व तशी परवानगी सुध्दा असल्याचे व्यावसायिक सांगतात. त्याचे प्रमाण १०० पीपीएम (पार्ट पर मिलियन) एवढा ठरले आहे. मात्र, आंबे झटपट पिकवून बाजारात विकण्यासाठी यापेक्षा जास्त प्रमाणात इथिलिनचा वापर केला जातो. व्यापाऱ्यांकडून दुसºया दिवशीच आंबे पिकले पाहिजे, असे नियोजन केले जाते. त्यामुळे १०० पीपीएम पेक्षा जास्त् इथिलिन स्प्रेचा वापर केला जात असल्याची खात्रीलायक माहिती आहे.पूर्वी कॅल्शियम कार्बाइडने सर्रास आंबे पिकविण्यासाठी वापर करण्यात येत होता. आताही तो छुप्या पद्धतीने करण्यात येत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. मात्र, याची जागा चायनिज पुड्यांनी घेतली आहे. यामध्ये सुद्धा कार्बाइड असते. आंब्याच्या एका कॅरेटमध्ये ती टाकली व वरून पेपर रद्दी टाकली की, आंबे पिकतात, असे एका व्यावसायिकाने सांगितले.सतत जास्त प्रमाणात इथिलिन स्प्रे, पावडर व कॅल्शियम कार्बाईडने पिकविलेले आंबे सेवन केले, तर कर्करोगासारखा घातक आजारही होऊ शकतो. दुर्दैवाने यावर नियंत्रण ठेवण्याकडे अन्न व प्रशासन विभागाने दुर्लक्ष केले आहे.५० पेक्षा जास्त फळ व्यापारीअमरावती कृषिउत्पन्न बाजार समितीच्या फळ व भाजीबाजारात नोंदणीकृत ५० पेक्षा जास्त फळांचे व्यापारी आहेत. त्यांच्यामार्फत विविध फळांची विक्री करण्यात येते. उन्हाळ्यात आंबे विक्रीतून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. शहरातील पाचशेपेक्षा जास्त किरकोळ विक्रेते या ठोक व्यापाºयांकडून आंबे विकत घेऊन शहरातील विविध चौकांत विक्री करीत असल्याची माहिती आहे. पिवळेधम दिसणारे हे आंबे हे रसायनांनी पिकविले जात असल्याने शरीरासाठी घातक ठरतात. ग्राहकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.