उत्साह, परंपरा आणि एकात्मता! महानगर तांड्याचा तीज उत्सव जल्लोषात साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 16:42 IST2025-08-22T16:42:20+5:302025-08-22T16:42:57+5:30

Amravati : तीज उत्सवाने महानगर तांडा एकवटला! लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत भावनिक सोहळा

Enthusiasm, tradition and unity! Mahanagar Tandya celebrates Teej festival with enthusiasm | उत्साह, परंपरा आणि एकात्मता! महानगर तांड्याचा तीज उत्सव जल्लोषात साजरा

Enthusiasm, tradition and unity! Mahanagar Tandya celebrates Teej festival with enthusiasm

अमरावती : महानगर तांड्याचा तीज उत्सव उत्साहात साजरा झाला. ९ ऑगस्टला तीज रोपणाचा कार्यक्रम तांड्याचे नायक प्रा.डॉ. शंकर चव्हाण यांच्यामार्फत संताजी हॉल संताजीनगर येथे घेण्यात आला. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात वेगवेगळ्या परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १६ ऑगस्टला संस्कार लॉन येथे ढंबोळीचा कार्यक्रम घेण्यात आला.
 

१७ ऑगस्टला शेवटच्या दिवशी महानगर तांड्याचे ज्येष्ठ मार्गदर्शन उदय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली विसर्जनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला तांड्याचे नायक, कारभारी शालिकराम राठोड, हसाबी मनोहर चव्हाण, नसाबी ॲड. राम आडे, आसामी बालकदास जाधव तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा.डॉ. अमरसिंग राठोड, राम पवार, उपसंचालक डॉ. प्रकाश चव्हाण, सहसंचालक पशुसंवर्धन डॉ. जयवंत वडते. संचालक मुक्त विद्यापीठ नाशिक अमरावती विभाग अमरावती. डॉ. दादाराव चव्हाण उपकुलसचिव संत गाडगेबाबा विद्यापीठ, अजाबराव राठोड से. नि.मोटार वाहक निरीक्षक, चंदनसिंग राठोड से.नि. विभागीय शिक्षण उपसंचालक, प्रवीण राठोड से.नि. उपकुलसचिव संत गाडगेबाबा विद्यापीठ, डॉ. रमेश जाधव, अर्चना जाधव उपायुक्त जीएसटी, प्रदीप पवार उपजिल्हाधिकारी, फुलसिंग राठोड विभागीय जनसंपर्क अधिकारीआदी गोर बंधू, भगिनी उपस्थित होते. संचालन प्रा. विशाल जाधव यांनी केले, प्रास्ताविक नायक शंकर चव्हाण यांनी केले, आभार प्रदर्शन तांड्याचे कारभारी शालिकराम राठोड यांनी मानले. तीज उत्सवानिमित्त तांड्यातील बंधू भगिनींना भोजन देण्यात आले.

Web Title: Enthusiasm, tradition and unity! Mahanagar Tandya celebrates Teej festival with enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.