शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यशास्त्राच्या विद्यार्थिनीला इंग्रजी विषयाची गुणपत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 06:00 IST

राज्यशास्त्राच्या विद्यार्थिनीला चक्क इंग्रजी वाङ्मय या विषयाची गुणपत्रिका देण्यात आली. त्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अचूक निकाल लावण्यात नापास झाल्याचे वास्तव समोर आले आहे. अल्केशा रवींद्र मडघे या विद्यार्थिनीने गुणपत्रिका दुरूस्तीसाठी विद्यापीठात धाव घेतली आहे.

ठळक मुद्देविद्यापीठाचा अजब कारभार : बीए पार्ट २ च्या सेमिस्टर तृतीयमधील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यशास्त्राच्या विद्यार्थिनीला चक्क इंग्रजी वाङ्मय या विषयाची गुणपत्रिका देण्यात आली. त्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अचूक निकाल लावण्यात नापास झाल्याचे वास्तव समोर आले आहे. अल्केशा रवींद्र मडघे या विद्यार्थिनीने गुणपत्रिका दुरूस्तीसाठी विद्यापीठात धाव घेतली आहे.विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यांकन संचालक हेमंत देशमुख यांना दिलेल्या पत्रानुसार, अंजनगाव सूर्जी येथील श्रीमती राधाबाई सारडा कॉलेज ऑफ आर्ट, कामर्स व सायन्स येथील बीए भाग २ ची विद्यार्थिनी अल्केशा रवींद्र मडघे हिने राज्यशास्त्र या विषयाचा पेपर दिला. मात्र, विद्यापीठाने बीए भाग २ सेमिस्टर ३ च्या गुणपत्रिकेत राज्यशास्त्राऐवजी इंग्रजी वाङ्मय या विषयाचे गुण अंकित करून गुणपत्रिका दिल्याचे पुढे आले आहे. या विद्यार्थिनीने न्यायासाठी गुरूवारी विद्यापीठात धाव घेतली असता, प्राचार्यांच्या स्वाक्षरीचे पत्र परीक्षा विभागाला देण्यात आले असून, अचूक गुणपत्रिका देण्याबाबतची विनंती करण्यात आली आहे.यंदा विद्यापीठात निकालाबाबत गंभीर समस्या निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थित वागणूक मिळत नसल्याची बहुतांश विद्यार्थ्यांची ओरड आहे. या महत्त्वाच्या बाबीकडे परीक्षा व मूल्यांकन अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.परीक्षा दिली तरीही गैरहजरअंजनगाव सूर्जी येथील श्रीमती राधाबाई सारडा कॉलेज ऑफ आर्ट, कामर्स व सायन्स महाविद्यालयाची विद्यार्थिनी रूपाली उल्हासराव अभ्यंकर हिला बी.ए. २ सेमिस्टर ३ (हिवाळी २०१८) मध्ये मराठी विषयात १८ गुण मिळाले होते. मात्र, विद्यापीठाने तयार केलेल्या पोर्टलवर तिचे नाव यादीत नसल्यामुळे गुणदान ‘क’ टेबलमध्ये भरण्यात आले नाही. त्यामुळे रूपाली या विद्यार्थिनीला गैरहजर दर्शविण्यात आले. तशीच गुणत्रिका तिला मिळाली आहे. या विद्यार्थिनीनेसुद्धा न्यायासाठी धाव घेतली आहे.

टॅग्स :universityविद्यापीठexamपरीक्षा