शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

कौशल्य विकास प्रशिक्षणांतर्गत ६२०६ मुला-मुलींना रोजगार, स्वयंरोजगार (सुधारित)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:10 IST

४२४९ महिला, १९५७ पुरुष रोजगार व स्वयंरोजगार (फोटो इंदलकड) इंदल चव्हाण-अमरावती : जिल्ह्यात सन २०१५ मध्ये जिल्हा कौशल्य विकास ...

४२४९ महिला, १९५७ पुरुष रोजगार व स्वयंरोजगार (फोटो इंदलकड)

इंदल चव्हाण-अमरावती : जिल्ह्यात सन २०१५ मध्ये जिल्हा कौशल्य विकास प्रशिक्षण व उद्योजकता केंद्राची स्थापना येथे करण्यात आली. आतापर्यंत ११ हजार १४ मुला-मुलींनी याद्वारा प्रशिक्षण घेतले. यामध्ये ४०१२ मुले आणि ७००२ मुलींचा समावेश आहे. यापैकी १९५७ मुले आणि ४२४९ मुलींनी स्वकौशल्यावर आधारित रोजगार निर्मितीतून संसाराला हातभार लावला आहे. १५ जुलै हा युवा कौशल्य विकास प्रशिक्षण दिन म्हणून पाळला जातो.

अमरावती जिल्ह्यात युवकांच्या अंगी कला, कौशल्य निर्माण होऊन त्यांना भावी जीवनात स्वयंरोजगार तथा रोजगाराचे साधन निर्मिती करणे सोयीचे होण्याच्या उद्देशाने शासनामार्फत ही योजना राबविली जात आहे. येथील जिल्हा कौशल्य विकास प्रशिक्षण व उद्योजकता विकास केंद्रात आतापर्यंत प्रमोद महाजन कौशल्य विकास प्रशिक्षण व अन्य योजनांतर्गत शैक्षणिक पात्रतेनुसार कौशल्य विकासाचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देऊन अनेक विद्यार्थ्यांना तयार करण्यात आले आहे. ६२०६ मुलांनी या माध्यमातून रोजगाराची संधी प्राप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोविड-१९ मुळे सध्या प्रशिक्षण बंद असले तरी मुख्यमंत्री े

महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाची सुरुवात ८ जुलै रोजी मुंबई येथे करण्यात आली. यामध्ये राज्यात २० हजार प्रशिक्षणार्थी तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्याकरिता या मुलांचे प्रशिक्षण सार्थक लागावे, या अपेक्षेने हे प्रशिक्षण राबविण्यात येत आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातून ६०० मुलांना आरोग्य क्षेत्रातील विविध कौशल्य गुणांवर आधारित प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यानुसार चार बॅचेस सद्यस्थितीत तयार करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात या योजनांतर्गत २०१६ ते २०२१मधील प्रशिक्षणार्थी, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (एनयूएलएम) ५९३३ विद्यार्थी, प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान ४०५३, किसान कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत ६७१, प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत ३५७ मुला-मुलींनी प्रशिक्षण घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बॉक्स

चार बॅचेसना वैद्यकीय प्रशिक्षण

रेडिएंट हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रुग्णालय, नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालय व अन्य एका ठिकाणी मार्गदर्शन करण्यात येत आहे. यात आकस्मिक वैद्यकीय उपचार पद्धती, ड्रेसर्स जनरल कोर्स असिस्टंट, मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट, होम हेल्थ एज ड्युटी मॅनेजर या सारखे कोर्सेसचे प्रशिक्षण त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार दिले जात आहे.

प्रशिक्षणाचे निकस

कौशल्य विकास प्रशिक्षण दोन विभागांतर्गत दिले जाते. यामध्ये प्रमोद महाजन कौशल्य विकास प्रशिक्षण योजना आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान प्रशिक्षण, किसान कौशल्य विकास कार्यक्रम,

प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रम असे चार भाग आहेत. यामध्ये दारिद्रयरेषेखालील विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येतो. प्रमोद महाजन कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रांतर्गत इयत्ता ८ पासून वयाच्या ४५ वर्षांपर्यंतची व्यक्ती हे प्रशिक्षण घेण्यास पात्र आहेत.

कोट

१५ जुलैला जातकिक युवा कौशल्य प्रशिक्षण दिन आहे. येथून सहा वर्षांत ११०१४ मुलांना प्रशिक्षण देण्यात आले असून, ६२०६ मुलांना रोजगार प्राप्त झालेला आहे. या दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा.

- प्रफुल्ल शेळके, सहायक आयुक्त, युवा कौशल्य विकास प्रशिक्षण व उद्योजकता विकास केंद्र, अमरावती