इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग, परिसरात एकच तारांबळ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 19:46 IST2024-10-04T19:44:44+5:302024-10-04T19:46:18+5:30

ही घटना टोईंग वाहन चालकाच्या लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. 

Electric bike suddenly caught fire, only one wire in the area   | इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग, परिसरात एकच तारांबळ  

इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग, परिसरात एकच तारांबळ  

अमरावती : पोलीस वाहतूक शाखेच्या कार्यालयाजवळ टोईंग वाहनातून नेणाऱ्या इलेक्ट्रिक मोपेड दुचाकीला अचानक आग लागली. या आगीत दुचाकी पूर्ण खाक झाली. ही घटना टोईंग वाहन चालकाच्या लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. 

शुक्रवारी संध्याकाळी सातच्या दरम्यान शेगावनाका चौकातील ग्राहकाच्या घरून राजापेठ येथील शोरूमला घेऊन जाणाऱ्या वाहनातील इलेक्ट्रिक मोपेड दुचाकीला अचानक आग लागल्याने एकच तारांबळ उडाली. आग लागल्याचे टोईंग वाहन चालकाच्या लक्षात येताच त्याने वाहन थांबविले. 

याबाबत लगेच अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. त्यानंतर तात्काळ दाखल झालेल्या अग्निशमन दलाने वाहन विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत मोपेड दुचाकी पूर्णपणे जळाली होती. सुदैवाने आग लागल्याचे टोईंग वाहन चालकाच्या लक्षात येताच त्याने वाहन थांबविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. 

Web Title: Electric bike suddenly caught fire, only one wire in the area