आठ हजार शेतकऱ्यांना केवायसीचा फटका; पीएम किसान हप्ता यावेळी मिळालाच नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 15:08 IST2025-02-27T15:07:33+5:302025-02-27T15:08:51+5:30
Amravati : पीएम किसान योजनेचा शेतकऱ्यांना १९ वा हप्ता

Eight thousand farmers affected by KYC; PM Kisan installment has not been received at this time
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वर्षभरापासून वारंवार सूचना दिल्यावरही ई-केवायसी न करणे ८४५७ शेतकऱ्यांना भोवले आहे. या शेतकऱ्यांना २४ फेब्रुवारीला वितरित झालेला प्रत्येकी दोन हजारांचा १९ व्या हप्त्याचा लाभमिळालेला नाही. केंद्र शासनाद्वारे पीएम किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांचा लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. दर चार महिन्यांत दोन हजारांचा हप्ता शेतकऱ्यांना मिळतो. याशिवाय याच योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचाही लाभदिला जातो. म्हणजेच योजनेत पात्र शेतकऱ्यांना दोन्ही योजनेचे प्रत्येकी सहा हजार असे एकूण १२ हजार रुपये मिळतात. या योजनेत अपात्र शेतकरी लाभ घेत असल्याचे केंद्र शासनाच्या लक्षात आल्याने लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य केले. यासाठी चारवेळा मुदतवाढ देण्यात आली; मात्र काही शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यांना या योजनेचा लाभमिळालेला नाही.
ई-केवायसी नसलेले तालुकानिहाय लाभार्थी
लाभार्थीकृषी विभागाच्या माहितीनुसार अचलपूर तालुक्यात ६३७, अमरावती ३४६, अंजनगाव सुर्जी २०१, भातकुली ७९२, चांदूररेल्वे ३५३, चांदूरबाजार ६१०, चिखलदरा ७१०, दर्यापूर ८११, धामणगाव रेल्वे ६९९, धारणी १५२, मोर्शी ५०५, नांदगाव खंडेश्वर ८३८, तिवसा ५६५ व वरुड तालुक्यात ५३८ शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही
२.८२ लाख शेतकऱ्यांना लाभ
योजनेत बँक खात्याची ई-केवायसी व आधार लिंक केलेल्या २,८२,७०२ पात्र खातेदारांना पीएम किसान सन्मान योजनेच्या १९ व्या हप्त्याचा लाभमिळालेला आहे.