शहरं
Join us  
Trending Stories
1
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
2
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
3
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
4
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
5
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
6
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
7
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
8
रक्ताची ‘बंगाली’ चटक; हिंसाचाराच्या आगीत होरपळणारा बंगाल
9
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
10
कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
11
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
12
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
13
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
14
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
15
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
16
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
18
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
19
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा आठ मृत्यू, ८९२ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:15 IST

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. यामध्ये रविवारी आठ जणांचा मृत्यू झाल्याने संक्रमितांची मृत्युसंख्या ५११ झाली ...

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. यामध्ये रविवारी आठ जणांचा मृत्यू झाल्याने संक्रमितांची मृत्युसंख्या ५११ झाली आहे. २४ तासांत ८९२ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाग्रस्तांची संख्या ३५,११७ झाली आहे.

जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढताच आहे. फेब्रुवारी महिन्याच्या २८ दिवसांत तब्बल १३ हजार १३८ रुग्णांची नोंद झाली. म्हणजेच दररोज सरासरी ४७० कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. ही आकडेवारी पाहता, जिल्ह्यात समूह संक्रमणाची भीती निर्माण झालेली आहे. याशिवाय फेब्रुवारी महिन्यात ९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत असलेली ४,४४६ ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ही आतापर्यंतची सर्वाधिक असल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी सप्टेंबर २०२० मध्ये ४१०० ही सर्वोच्च ॲक्टिव्ह रुग्णसंख्या होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने त्यापेक्षा जास्त बेडचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन आला, असे सांगण्यात येत असले तरी जिल्ह्यात ‘मिशेन बिगेन अगेन’ नंतर देण्यात आलेली मोकळीक हेदेखील संसर्ग वाढण्याचे कारण आहे. निवडणुकीच्या वेळी करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांमध्ये दोन टक्के पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली होती. आता हे प्रमाण सहा टक्क्यांवर पोहोचले आहे व हे असिम्प्टमॅटिक रुग्ण उघडपणे फिरत आहेत. जिल्ह्यात चाचण्यांचे चार हजारांवर लक्ष्यांक असले तरी दोन ते अडीच हजार चाचण्याच दररोज होत आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी एका रुग्णामागे २० चे लक्ष्यांक असताना दोन ते तीन असेच प्रमाण आहे. त्यामुळे जिल्ह्यावर लॉकडाऊनची वेळ ओढवली आहे.

बॉक्स

दिल्लीतील पथक आज अमरावतीमध्ये

जिल्ह्यासह यवतमाळ व अकोला जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढताच असल्याने केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाचे तीन सदस्यीय पथक सोमवारी सकाळी जिल्ह्यात दाखल होत आहे. यामध्ये दोन डॉक्टर व एक आयएएस अधिकारी आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक अधिकारी जाणार आहे व आढावा घेऊन काही निर्देश देणार असल्याची माहिती आरोग्य यंत्रणाद्वारे देण्यात आली.

बॉक्स

रविवारी आठ मृत्यू

जिल्ह्यात २४ तासांत अशोकनगर येथील ७० वर्षीय महिला, कॅम्प रोड येथील ८२ वर्षीय पुरुष, बिलानपूर येथील ८२ वर्षीय पुरुष, अचलपूर येथील ८१ वर्षीय पुरुष, कसबेगव्हाण येथील ५१ वर्षीय पुरुष, द्वारकानगरातील ७१ वर्षीय पुरुष, मोतीनगरातील ६२ वर्षीय पुरुष व महेंद्र कॉलनीतील ६० वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.

बॉक्स

पुन्हा एक आमदार पॉझिटिव्ह

जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदाराचा अहवाल रविवार पॉझिटिव्ह आला. ते मुंबईला विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला जायला निघाले होेते. त्यांनी संपर्कातील व्यक्तींना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी जिल्ह्याच्या खासदारासह बडनेरा, मोर्शी, दर्यापूरचे आमदार, माजी मंत्री व माजी आमदार पॉझिटिव्ह आले आहेत.