कोटक महिंद्रा बँकेत आढळल्या ५०० रुपयांच्या आठ बनावट नोटा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 12:25 PM2024-05-16T12:25:58+5:302024-05-16T12:26:31+5:30

गुन्हा दाखल : सराफ्यातील बँकेतही आढळली होती फेक करन्सी

Eight fake notes of Rs 500 found in Kotak Mahindra Bank | कोटक महिंद्रा बँकेत आढळल्या ५०० रुपयांच्या आठ बनावट नोटा

Eight fake notes of Rs 500 found in Kotak Mahindra Bank

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
जयस्तंभ चौक स्थित कोटक महिंद्रा बँकेत ५०० रुपयांच्या आठ बनावट नोटा आढळल्या. १४ मे रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास तो प्रकार उघड झाला. याप्रकरणी बँक कर्मचारी श्रीकांत काळे (२१, रा. चांदूर बाजार) यांच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी १४ मे रोजी रात्री ९ च्या सुमारास अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

१४ मे रोजी एक ग्राहक पाच लाख रुपये घेऊन ती रक्कम डिपॉझिट करण्यासाठी कोटक महिंद्रा बँकेत आले होते. पैकी ८०० नोटा या ५०० रुपयांच्या स्वरूपात होत्या. काळे ती रक्कम मोजत असताना त्यांना त्यातील आठ नोटा बनावट आढळून आल्या. त्यामुळे काळे यांनी त्या नोटांची पुन्हा पडताळणी केली तेव्हा त्या बनावटच असल्याचे शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे काळे यांनी आपल्या वरिष्ठांना त्याबाबत माहिती देऊन सायंकाळी सिटी कोतवाली पोलिस ठाणे गाठले.


२० नोटा बनावट
विशेष म्हणजे, बँक ऑफ बडोदाच्या सराफा बाजार शाखेत ५०० रुपयांच्या २० नोटा बनावट असल्याचे आढळून आले होते. १६ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ च्या दरम्यान वेगवेगळ्या तीन खातेदारांनी भरलेल्या रकमेत त्या २० नोटा बनावट आढळल्याची तक्रार खोलापुरी गेट पोलिस ठाण्यात करण्यात आली. शाखा व्यवस्थापक शशिकांत वारके (४४) यांच्या तक्रारीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी ३ मे रोजी सायंकाळी अज्ञात आरोपीविरुद्ध नकली नोटा चलन म्हणून (कलम ४८९ ब) वापरल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
 

Web Title: Eight fake notes of Rs 500 found in Kotak Mahindra Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.